गोवा

Goa News: संदीप चौधरी अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Today's Live News Updates: गोव्यातील पर्यटन, राजकारण, गुन्हे, अपघात, मान्सून, वाहतूक, क्रीडा, कला आणि संस्कृती व इव्हेंट यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

Goa Crime: संदीप चौधरी अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

फोंड्यातील व्यवसायिक संदीप चौधरी अपहरण प्रकरणाच्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना यश. संशयिताला घेऊन पोलिस फोंड्यात दाखल.

पाऊस आला धावून; रस्ता गेला वाहून; अंडरग्राऊंड केबलींगच्या चुकीच्या कामाचा फटका, Video

ओला-उबर गोव्यात येणार नाही: मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितले

टॅक्सी चालकांशी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, "लोकांनी गोंधळून जाऊ नये. ओला-उबर गोव्यात येणार नाही. आम्ही सर्वांना विचारात घेऊन समस्या सोडवू."

उद्घाटनाचा पत्ता नाही, साकोर्डा पंचायतीचे छत कोसळले

नव्याने बांधलेल्या आणि अजून उद्घाटन न झालेल्या साकोर्डा पंचायतीच्या छताचा भाग कोसळला. सुदैवाने तिथे कोणीच नसल्याने दुर्घटना टळली‌. घडलेल्या प्रकारावरुन लोकांमध्ये उलट सुलट चर्चा.

कारवार – अंकोला महामार्गावर दरड कोसळली, वाहतूक बंद

कारवार अंकोला महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुरुंग येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गोमंतकीयांना सरकारी नोकरीची संधी, GPSC च्या वतीने २४ जागांवर भरती

जीपीएससीच्या वतीने २४ जागांवर भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहाय्यक कृषी अधिकागोमंतकीयांना सरकारी नोकरीची संधी, GPSC च्या वतीने २४ जागांवर भरती अर्ज करता येणार आहे.

Goa Accident: राज्यातील ७० टक्के अपघात रेन्टेड वाहनांमुळे; मुख्यमंत्री सावंत

गोव्यातील ७० टक्के अपघात रेन्टेड वाहनांच्या बेशिस्तपणामुळे होतात असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे कठोर पालन आवश्यक असल्याचे सावंत म्हणाले. नागरिकांनी देखील यात सहकार्य करावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

Goa Landslide: उसगाव; दरड कोसळून दोन घरांचे नुकसान

सिद्धेश्वरनगर- उसगाव येथे कविता हिरेमठ यांच्या घराच्या मागची संरक्षण भिंत घरावर कोसळली. तर मनोहर दोत्रे यांच्या घराच्या समोरील भाग दुसऱ्या घरावर कोसळला. मुसळधार पावसात मोठे नुकसान.

उसगावात घरावर कोसळली दरड

टाकीवाडा- उसगाव येथे प्रदीप पाल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेली दरड कोसळली. सुदैवाने घरातील सर्वजण सुखरूप. मात्र, परिसरात अजून दरड कोसळण्याचा धोका कायम.

Goa Monsoon 2025: गोव्यात पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT