Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: फॉर्म्युला 4 रेसिंग स्पर्धेचे ठिकाण बदलणार

Goa Today's News Live Updates In Marathi: गोव्यातील राजकारण, पर्यटन, गुन्हे, कला -क्रीडा - संस्कृती, पर्पल फेस्टीव्हल यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

कोट्यवधींचा जमीन घोटाळा; सुकूर बार्देश येथून एकाला अटक

कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सुकूर बार्देश येथील एकास अटक करण्यात आली आहे. हणजूण येथील जमीन घोटळ्यासंबधित ही अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे दाखल करुन जमीन हस्तांतरण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

आजपासून २३ दिवस बोरी पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी राहणार बंद

आजपासून (११ ऑक्टोबर) ०२ नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बोरी पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ११ – १२ ऑक्टोबर (रात्री ०८ ते सकाळी ०८) १८  - १९ ऑक्टोबर (रात्री १० ते सकाळी ०६), २५ – १६ ऑक्टोबर (रात्री ८ ते सकाळी ८) आणि १ – २ नोव्हेंबर (रात्री १० ते सकाळी ६) याकाळत पूल बंद राहणार आहे.

टीका करण्यापूर्वी माझे घर योजना व्यवस्थित समजून घ्या; दामू नाईक

टीका करण्यापूर्वी माझे योजना व्यवस्थित समजून घ्या, असा सल्ला दामू नाईक यांनी योजनेवर टीका करणाऱ्यांना दिला आहे. योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. योजना राज्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी याला घाबरुन न जाता त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पारंपरिक शेतीबरोबरच सार्वत्रिक शेतीवर भर द्या - मुख्यमंत्री

केवळ पारंपरिक भातशेतीच न करता आता सार्वत्रिक कृषीलागवडीला प्राधान्य द्या. सरकार दरवर्षी कृषी क्षेत्रावर विविध माध्यमातून सुमारे ५०० कोटी रू. खर्च करते, मात्र शेतकरी शेतात उतरत नाहीत हि मोठी खंत वाटते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दक्षिण गोव्यात अनेक भागांत मर्यादीत पाणी पुरवठा; शेळपे – सांगे येथील प्रकल्पाचे काम लांबणीवर

शेळपे सांगे येथील पाणी प्रक्रिया प्रकल्प १४ तारखेला बंद ठेवला जाणार होता. दरम्यान, हा नियोजित बंद पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, १४ आणि १५ तारखेला सांगे, केपे, कुडचडे, सावर्डे, कुडतरी, कुंकळ्ळी, वेळी, बाणावली, मडगाव, नुवे, दाबोळी, वास्को आणि मुरगाव येथे मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे.

पारंपरिक शेतीबरोबरच सार्वत्रिक शेतीवथ भर द्या - मुख्यमंत्री

केवळ पारंपरिक भातशेतीच न करता आता सार्वत्रिक कृषीलागवडीला प्राधान्य द्या. सरकार दरवर्षी कृषी क्षेत्रावर विविध माध्यमातून सुमारे ५०० कोटी रू. खर्च करते, मात्र शेतकरी शेतात उतरत नाहीत हि मोठी खंत वाटते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

"आरोप करण्यापूर्वी 'म्हजे घर' योजना समजून घ्या" दामू नाईक

आरोप करण्यापूर्वी 'म्हजे घर' योजना समजून घ्या. भाजप अध्यक्ष दामू नाईक यांचा टीकाकारांवर प्रत्युत्तर

झेब्रा क्रॉसिंग, साइनबोर्ड आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात

बांबोळी येथे नर्सिंगचे विद्यार्थी दररोज जीव धोक्यात घालतात. सरकारी नर्सिंग स्कूलजवळ झेब्रा क्रॉसिंग, साइनबोर्ड आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

'रामा'ला डिस्चार्ज!

गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना कैक दिवसांच्या हल्ल्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून 'डिस्चार्ज' मिळाला आहे.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली बस ऑपरेटर्सना पाठिंबा देण्याची विनंती

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला नवीन बस खरेदी करण्यासाठी डिझेल सबसिडी आणि व्याजमुक्त बँक कर्ज देऊन खाजगी बस ऑपरेटर्सना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

हात मशीनमधे जाऊन महिला जबर जखमी

होंडा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोवा बागायतदार संस्थेच्या पॅकिंग युनिटमध्ये काम करत असताना महिला कामगाराचा हात मशीनमधे जाऊन महिला जबर जखमी, तिच्यावर साखळीत आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू

वाळपईत ढगफुटी...

वाळपईत ढगफुटी... काही वेळासाठी पडलेल्या पावसामुळे वाळपई आरोग्य केंद्र समोर साचलेले पावसाचे पाणी

ऍक्टिव्हा स्कूटर आणि रिक्षा यामध्ये केलेल्या भीषण अपघात

होंडा सत्तरी येथे ऍक्टिव्हा स्कूटर आणि रिक्षा यामध्ये केलेल्या भीषण अपघातात स्कूटरच्या मागे बसलेला नागराज बंदीरवार (१८) गोमेकोत उपचार सुरू असताना मरण.

मोले पंचायत क्षेत्रात खासगी बस बंद

मोले पंचायत क्षेत्रातील सांगोड, काजूमळ, धाटफार्म आणि पळसकटा या गावातून जाणारी खासगी बस बंद. लोकांचे हाल. कदंब बस सुरु करण्याची मागणी

फॉर्म्युला ४ रेसिंग स्पर्धेचे ठिकाण बदलणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्टी केली की फॉर्म्युला ४ रेसिंग स्पर्धेचे ठिकाण वेगळ्या ठिकाणी बदलले जाईल आणि कार्यक्रमाच्या तारखा पुढे ढकलल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT