Goa News उदय मडकईकर Dainik Gomantak
गोवा

पणजी मतदारसंघात मोन्सेरात कुटुंबाची दादागिरी

उदय मडकईकर : नॅशनल थिएटर विषयावरून साधला निशाणा

दैनिक गोमन्तक

पणजी Goa News: नॅशनल थिएटरच्या मुद्यावर महापौरांनी आम्हाला बोलूच दिले नाही. ही खरे तर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. पणजीत (Panjim) मोन्सेरात कुटुंबीयांची दादागिरी सुरू आहे. या दादागिरीला निवडणुकीत सडेतोड उत्तर मिळेल, असा इशारा नगरसेवक उदय मडकईकर (Corporator Uday Madakaikar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महानगरपालिकेच्या काल झालेल्या बैठकीत नॅशनल थिएटरचा मुद्दा गाजला होता. थिएटर विक्रीला काढल्यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. त्याबाबत बोलताना मडकईकर म्हणाले, महापौरांना कोणत्याच ऐतिहासिक वास्तूबाबत माहिती नाही. ते बालिशपणे निर्णय घेत आहेत. गोव्याचा इतिहास जपण्याबाबत त्यांना आत्मीयता नाही. शिवाय त्यांचे पणजीत केवळ फॅमिली राज चालले आहे. येत्या काळात मतदार त्यांना योग्य ते उत्तर देतील.

नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो म्हणाले की, महापालिकेत आम्हाला कोणत्याच विषयावर मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. प्रत्येकवेळी बहुमताच्या जोरावर विविध निर्णय घेतले जातात, जे गोव्याच्या हिताचे नाहीत. हे प्रकार रोखले पाहिजेत. नगरसेवक ज्‍योएल आंद्राद यांचीही यावेळी उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT