kudchade Rain News  Dainik Gomantak
गोवा

कुडचडे येथे आंबेडकर चौक पाण्याखाली

दरवर्षी रस्ता पाण्याखाली जात असल्याने नागरिकात संताप

दैनिक गोमन्तक

काल रात्रीपासून गोवा राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामूळे राज्यातील अनेक भागात पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. तसेच अनेक घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कुडचडे येथील आंबेडकर चौकाजवळ यंदाही पाणी रस्त्यावर भरून वाहत आहे. यामूळे वाहनचालकांना आपली वाहने पाण्यातून काढावी लागत आहेत. (Goa News: Ambedkar Chowk under water at Kudchade )

आंबेडकर चौकाजवळ रस्त्यांचे रुंदीकरण करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नीट व्यवस्था न केल्याने दर वर्षी केपेला जाणारा रस्ता पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना त्रास होतो. प्रशासन येथे काही जीवित हाणी होण्याची वाट पाहते आहे का ? असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत. दरवर्षी रस्ता पाण्याने बुडत असल्याचे दिसून सुद्धा यावर कोणतीच उपाययोजना न केल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे.

याविषयी नगराध्यक्षा जासमीन ब्रागंझा यांना विचारले असता, त्यांनी पाऊस मोठा पडला की, या रस्त्यावर पाणी येत असल्याचे मान्य केले. पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेल्या वाटेवर कचरा अडकल्याने रस्त्यावर पाणी आले असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रागंझा यांनी सदर रस्त्याची पाहणी करून जे सी बी आणून पाण्याची वाट मोकळी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आपण आवश्यक तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT