Goa New Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa New Shack Policy: शॅक वाटपाचा नवा फॉर्म्युला जाहीर; 80 टक्के शॅक्स अनुभवी व्यावसायिकांना देणार...

शॅक व्यावसायिकांसोबत बैठकीनंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटेंची माहिती

Akshay Nirmale

Goa New Shack Policy: गोव्यात नवीन शॅक धोरणावरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज, गुरूवारी मुख्यमंत्र्यानी शॅक व्यावसायिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीतून शॅक वाटपाचा नवा फॉर्म्युला काढण्यात आला आहे. 80-10-10 असा हा फॉर्म्युला आहे.

त्यानुसार आता एकूण शॅक्सपैकी 80 टक्के शॅक्स या क्षेत्रातील पाच वर्षाहून अधिक अनुभव असणाऱ्यांना देण्यात येणार आहेत. तर 10 टक्के शॅक्स एक ते चार वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना देण्यात येणार आहे. तर 10 टक्के शॅक्स नवीन व्यावसायिकांना देण्यात येणार आहे.

नव्या शॅक पॉलिसीवरून सरकारमधीलच दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. कळंगुटचे आमदार मायकल लोबो एका बाजूला तर पर्यटन मंत्री रोहन खंवटे दुसऱ्या बाजूला असा हा संघर्ष दिसून येत होता.

धोरण ठरवताना सरकार नेहमी संबंधितांना विश्वासात घेते मग शॅक धोरणावेळीच व्यावसायिकांना का विश्वासात घेतले जात नाही, असा सवाल करत मागुनही धोरणाची प्रत व्यावसायिकांना दिली जात नाही, असे आमदार लोबो म्हणाले होते.

नव्या धोरणातील तरतुदी आगामी पर्यटन हंगामापासून लागू करणे शक्य होणार नाही, असेही लोबो यांचे मत होते. तर खंवटे यांनी पारंपरिक पद्धतीने शॅक्स उभाराव्यात, त्यासाठी दोन ठिकाणी प्रारूप शॅक्स उभारण्याची तयारी केली होती.

त्याला लोबो यांचा विरोध आहे. दरम्यान, यापुर्वी शॅक व्यावसायिकांचेही तळ्यात-मळ्यात चालल्याचे दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT