पर्यटनासाठी आणि विविध संस्कृतीने नटलेल्या गोव्याला दुसरे विमानतळ मिळाले आहे. उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा (Mopa) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरु झाले आहे. ‘जीएमआर’ कंपनीकडून (GMR Company) चालवण्यात येणाऱ्या या विमानतळावर पहिल्याच दिवशी 11 विमाने उतरतील व उड्डाणे घेणार आहेत. आज मोपा विमानतळावर पहिले इंडिगो कंपनीचे (Indigo) विमान उतरले आहे. हैद्राबाद-गोवा फ्लाइट क्रमांक 6 E 6145 ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली आहे. यावेळी पहिल्या विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत गॅंड वेलकम करण्यात आले आहे.
हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेली फ्लाईट मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचली. एक तासांत या फ्लाईने हैद्राबाद-गोवा अंतर पूर्ण केले आहे. विमानतळावरी उतरलेल्या प्रवाशांचे वाजत गाजत गॅंड वेलकम करण्यात आले आहे.या व्हिडिओमध्ये बॅड वाजवणारे दिसत आहे. तर प्रवाशांना फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा मोह आवरत नाहीय. प्रवासांचे गुलाबाचे फुल देउन खास अंदाजामध्ये स्वागत केले गेले आहे.
पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले
या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर गोव्यातील (North Goa) मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नाही तर जवळच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने देशातील आठ शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. यामुळे उत्तर गोव्यात पर्यटन व्यवसायाला भरारी येण्याची शक्यता आहे.
इंडिगोच्या दर आठवड्याला 168 उड्डाणे
इंडिगोने (Indigo) मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. आजपासून ही उड्डाणे सुरू झाली आहे. गोव्याचे पहिले विमानतळ दक्षिण गोव्यातील दाभोळी येथे आहे. चापोरा किल्ला, वागेटर बीच, अंजुना बीच, फोर्ट अगुआडा, बागा बीच, कडोलिम बीच, कलंगुट बीच, सिंक्वेरिम बीच, रेस मॅगोस फोर्ट, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, द चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन यासारखी गोव्यातील (Goa) प्रसिद्ध पर्यटन स्थळे फक्त गोव्यात आहे. नवे विमानतळ सुरू झाल्यामुळे पर्यटकांना खूप सोयीसुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.