भविष्यात भ्रमणध्वनी मनोरे उभे केल्यास ही समस्या निकालात निघेल, असा आशावाद शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी गोमन्तकशी बोलतांना व्यक्त केला. Dainik Gomantak
गोवा

Goa: ऑनलाईन शिक्षणासाठी नेट सुविधा हवीच

द युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन फ्लस रिपोर्टनुसार देशात फक्त २२ टक्केच शाळांतून इंटरनेट सुविधा आहे. पण गोव्यात जवळ ७० टक्के शाळातून नेट सुविधा आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : अत्यावश्यक सेवा म्हणून प्रत्येक शाळेत संगणक (Computer), इंटरनेटप्रणाली (Internet system) आवश्यक आहे. कारण सध्या कोविडमुळे (Covid 19) ऑनलाईन शिक्षणाशिवाय (online education) पर्याय नाही. राज्यातील माध्यमिक स्तरावर सर्वच शाळांतून संगणक आहेत. पण शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण, दुर्गम भागात इंटरनेट समस्या आहे, त्यामुळे अखंडित ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविता येत नाही. भविष्यात भ्रमणध्वनी मनोरे उभे केल्यास ही समस्या निकालात निघेल, असा आशावाद शिक्षण संचालक दिलीप भगत (Director of Education Dilip Bhagat) यांनी गोमन्तकशी बोलतांना व्यक्त केला.

भगत पुढे म्हणाले, द युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन फ्लस रिपोर्टनुसार देशात फक्त २२ टक्केच शाळांतून इंटरनेट सुविधा आहे. पण गोव्यात जवळ ७० टक्के शाळातून नेट सुविधा आहे. त्यामुळे शहरातून चांगल्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागातच नेट समस्या असल्यामुळे तेथे ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येतो. कोविडमुळे राज्यात अनेक शाळातून शिक्षक मोकळ्या वर्गात बसून, फळ्यासमोर उभे राहून शिकवतात आणि विद्यार्थी घरात बसून हजेरी लावतात. ज्या विद्यार्थ्यांना नेट समस्या आहे, त्यांना अध्ययनासाठी व्हिडिओ, पीडीएफ फाईल पालकांतर्फे, वॉटसअपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे अध्ययन, अध्यापन अखंडित सुरू आहे. गेल्या वर्षी अचानक आलेल्या कोविडमुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. पण यंदा गेल्यावर्षीच्या अनुभवानुसार शाळा वेळेत सुरू झाल्या. त्यामुळे अध्यापन व्यवस्थित सुरू आहे.

भविष्यातील ऑनलाईनची गरज लक्षात घेऊन शासनातर्फे नेटसमस्येसंदर्भात उपाययोजनावर विचार सुरू आहे. काही भागात भ्रमणध्वी मनोऱ्याचे प्रस्ताव आहेत. शासनाबरोबरच ग्रामीण भागातसुद्दा ग्रामस्थांनी स्वतः होऊन भ्रमणध्वनी मनोऱ्यांसाठी सहकार्य करण्याची गरज आहे. काही वेळेला विरोध होतो, म्हणून टॉवर उभारले जात नाहीत. शिक्षणासाठी पायाभूत सुविधा म्हणजे चांगली इमारत, मैदान, ग्रंथालय, पाणी, शौचालये अशा घटकांचा विचार केला जातो, परंतु भविष्याचा विचार करताना आज इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. काळाबरोबरच पुढे जाण्यासाठी दूरस्थ शिक्षणावर भर द्यावा लागत आहे. ग्रामीण, दुर्गंम भागात राहाणाऱ्यांसाठी इंटरनेट सुविधा पोचणे गरजेचे आहे. या सुविधा नसतील तर अंधारात चाचपडण्यासारखे होते. या सुविधा सर्वांपर्यंत पोचविण्यास शासन, मोबाईल कंपन्यांनाही सहकार्य करणे गरजेचे आहे. नॅशनल ब्रॉडबॅंड मिशन, बीएसएनएल नेटवर्क आणि इतर सर्व्हिंस प्रोव्हायडरच्या सहकार्याने या सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे मत भगत यांनी व्यक्त केले.

- प्राथमिक स्तरावर १ ली ते ४ थी च्या जवळ ९९००० विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईलद्वारे अध्ययन साहित्य, व्हिडिओद्वारे शिक्षण साहित्य पुरवले जाते. तसेच पालकांमार्फत घरोघरी अध्ययन साहित्य दिले जाते.

- माध्यमिक स्तरावर १५०००० विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन धडे देण्यात येतात. ज्या ठिकाणी नेट सुविधा नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्कातून किंवा पालकांकडून साहित्य देण्यास सुरवात झालेली आहे.

- उच्च माध्यमिक स्तरावर १३००० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्या त्या शिक्षण शाखेच्या गरजेनुसार ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. ही मुले थोडी मोठी असल्यामुळे स्वतः नेट असेल तिथे उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

- देशाच्या तुलनेत राज्यात अध्ययन, अध्यापनाची स्थिती चांगली आहे, भागशिक्षणाधिकारी परिस्थिवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय शिक्षकवर्गही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खूपच नेमकेपणाने विद्यार्थ्यांना सुविधा पुरवत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT