जंगली प्राण्यांना मानवनिर्मित बॉर्डर (सीमा) माहिती नसतात, पण ते उत्तम व्यवस्थापक असतात. त्यामुळे नैसर्गिक गरजा आणि गुणधर्मानुसार निसर्गात त्यांचा संचार असतो. आपण म्हणतो तो वाघ, हत्ती, गवे त्या राज्यातून आले किंवा आपल्या काही प्राण्यांनी स्थलांतर केले, पण त्यांना या सीमा माहितीच नसतात. त्याशिवाय त्यांच्यावर आपण ते आपले म्हणून टॅग करू शकत नाही. त्यामुळे जंगल कॉरिडॉरचा (Jungle Corridor) विचार करून त्यांचे संवर्धन (Animal Conservation) आणि संरक्षण (Animal Protection) यासाठी विविध राज्यांच्या वनखात्याने संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत, असे मत गोव्यातील (Goa) वनाधिकारी परेश परोब यांनी व्यक्त केले आहे.
(Goa needs jungle corridor for wild animals)
राज्यात वाघांच्या अस्तित्वाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते. मात्र, यापूर्वी वनखात्याने विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेकवेळेला वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. मागे झालेल्या चार वाघांच्या हत्येनंतर राज्यातल्या वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तबच झाले.
वाघ हा जंगलातील ‘ॲपेक्स प्रिडिएटर’ म्हणजे सर्वोच्च भक्षक आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी प्राधान्यक्रम असलाच पाहिजे. वाघ हा समृद्ध पर्यावरणाचा प्रतीक आहे. त्याचे अस्तित्व हे समृद्ध जंगल आणि विपुल पाणीसुद्धा स्पष्ट करते. युनेस्कोच्या अस्तित्वाच्या मानांकनानुसार सध्या वाघ हा संकटग्रस्त प्राणी आहे. जगभरात सुमारे साडेचार हजारांच्या आसपास वाघ आहेत. त्यापैकी ७० टक्के आपल्या देशात आहेत. ‘बिग कॅट’ फॅमिलीतील बिबटे, काळे बिबटे यांचेही अस्तित्व राज्यातील जंगलात आहे. मधल्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात खाणी सुरू होत्या. त्यामुळे जंगली प्राण्यांची स्थानिक ये-जा (स्थलांतर) अपेक्षित होते, मात्र हे प्राणी परत आपल्या मूळ स्थानी येत आहेत. हे अत्यंत उत्साहवर्धक आहे.
जगातील वाघांपैकी 70 टक्क्यांहून अधिक वाघ भारतात असल्याचे गतवर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आल्याचा दावा तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला होता. सध्या देशात 2967 वाघ आहेत, हा विक्रम आहे. व्याघ्र संवर्धित देशांच्या तुलनेत ही संख्या आश्चर्यकारक आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
28 जुलै 2020 रोजी सर्वे सुरू
13 व्याघ्र प्रकल्पांत झाला सर्वे
5,22,966 चौ. किमी जंगलात सुमारे २८ व्याघ्र प्रकल्पांत कॅमेरे लावले गेले होते.
26 हजार 838 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप
अत्याधुनिक ‘लायडार’ तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच झाला होता वापर.
2461 वाघ प्रत्यक्ष दृष्टीस पडले.
देशातील 18 राज्यांत 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. 1973 पर्यंत केवळ नऊ व्याघ्रप्रकल्प होते.
सध्या मध्यप्रदेशात सर्वाधिक 526, कर्नाटकात 521 व उत्तराखंडमध्ये 442 वाघ आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.