Goa Nature of Salgini
Goa Nature of Salgini Dainik Gomantak
गोवा

Goa Nature : निसर्गसंपन्न साळजिणी गाव कात टाकतोय !

दैनिक गोमन्तक

मनोदय फडते

सांगे : गोवा मुक्तीच्या साठ वर्षांत या गावात वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, अजून पक्का रस्ता आलेला नाही. भाऊसाहेब बांदोडकर सरकारच्या काळात बांधलेली आणि पर्रीकर सरकारच्या काळात नूतनीकरण केलेली शाळा आहे. आरोग्यकेंद्र तर नाहीच. इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा किंवा भारतीय दूरसंचार निगमची साधी सेवाही नाही. साठ वर्षात गोवा बदलला, पण हा गाव ‘जैसे थे’ आहे.

पर्यटन खात्याने जर या निसर्गरम्य गावाचा अभ्यास केल्यास बऱ्याच फायदेशीर गोष्टी इथे घडू शकते. गाव तसा लहानसा. पण मॅगनीज खाणी बंद झाल्याने अन्य व्यवसाय या गावात नसल्याने व त्याच बरोबर दळण वळण म्हणून खनिज वाहू डम्पर चा वापरही बंद झाल्याने अनेक ग्रामस्थांनी रोजगार शोधण्यासाठी, मुलांच्या शिक्षणाचा विचार करून आजही अनेकजण नेत्रावळी, कुडचडेसारख्या ठिकाणी स्थलांतरीत झाले असले तरी गाव म्हणून नाळ कायम जोडलेली आहे.

हेच ग्रामस्थ साळजिणी गावात सुखसोयी आणि रोजगार उपलब्ध झाल्यास आनंदाने पुन्हा स्थायिक होऊ शकतील. साळजिणी, वेर्ले आणि तुडव या डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने कोणतीही वाहतूक सोय उपलब्ध करून न दिल्याने विद्यार्थ्यांचे फार हाल होतात.

गोव्याच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला वसलेला निसर्गरम्य गाव म्हणजे नेत्रावळीतील साळजिणी गाव. पावसाळ्यात संततधार बरसणाऱ्या पावसामुळे गोव्याची चेरापुंजी अशीही ओळख या गावाची आहे.

सभोवताली हिरवेगार डोंगर-दऱ्या, अधून मधून वाहणारे फेसाळते धबधबे ही सर्व निसर्गाची किमया या गावाला भेट देणारा प्रत्येकजण नक्कीच अनुभवू शकतो. पण असा निसर्गसंपन्न साळजिणी गाव गोवा मुक्तीनंतरही गेल्या साठ वर्षात विकासाच्या प्रवाहात येऊ शकला नाही. एकमेव कदंब बस दिवसातून एकदा गावात येते, हीच काय ती उपलब्धी.

पक्का रस्‍ताच दाखवेल विकासाचा मार्ग!

खनिज व्यवसाय बंद झाल्यास तितक्याच ताकदीचा पर्यटन व्यवसाय या गावात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. पण त्या आधी गावाला जोडणारा रस्ता पक्का होणे आवश्यक आहे. पर्यटन खात्याने या गावात पर्यटकांच्या निवासासाठी पर्यटन कुटिरे बांधून या गावाविषयी चांगली जाहिरातबाजी केल्यास बारमाही पर्यटन केंद्र बनेल.

पावसाळी पर्यटन, उन्हाळी पर्यटन, हिवाळी पर्यटनासाठी नवे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना माहीत होईल. त्यातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होऊन गावचे अर्थचक्र चालू शकेल, असे रहिवाशांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

SCROLL FOR NEXT