37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: स्पर्धा लांबणीवर टाकण्यास तीव्र विरोध; 'स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात'- क्रीडामंत्री

ठरल्यानुसार स्पर्धेसाठी क्रीडा संघटना अनुकूल

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games: गोव्यातील नियोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या कारभारावर तीव्र टीका करून गुजरात ऑलिंपिक संघटनेने स्पर्धा लांबणीवर टाकण्याची मागणी केल्यानंतर गुरुवारी त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले.

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना स्पर्धेची तयारी पाहण्यासाठी प्रत्यक्ष ‘मैदानावर’ उतरावे लागले. स्पर्धेनिमित्त सध्या तयारी अंतिम टप्प्यात असून खेळाडूही मेहनत घेत आहेत. त्यामुळे स्पर्धा ठरल्यानुसारच घेऊन काही राज्य क्रीडा संघटनांनी स्पर्धा लांबणीवर टाकण्यास विरोध दर्शविला.

तथापि, आज (गुरुवारी) सायंकाळी उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून काहीही कळवण्यात आलेले नव्हते.

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव आणि गोवा ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष जयेश नाईक यांनी सांगितले की, ‘‘राष्ट्रीय स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी स्पर्धा लांबणीवर टाकणे योग्य होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT