goa crime Dainik Gomantak
गोवा

लोलये खून प्रकरण: अंकिताच्या मृतदेहावर आढळल्‍या जखमा

अंकिताच्‍या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: तामणे-लोलये येथे घडलेल्‍या मायलेकीच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूप्रकरणाने (Goa Crime) काणकोण नव्‍हे तर संपूर्ण राज्‍याला हादरवून सोडले आहे. मुलगी अंकिता प्रकाश पोळजी हिच्या मृतदेहाची चिकित्सा मडगावच्‍या हॉस्पिसियो इस्पितळात करण्यात आली. हा अहवाल दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत अंकिताच्‍या मृतदेहावर काही जखमा व ओरबडल्‍याच्‍या खुणा सापडल्‍या आहेत. त्यामुळे तिच्या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांच्यामार्फत या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा जतन करून पुढील तपासासाठी तो हैदराबाद येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काणकोण पोलिस स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यांनी सांगितले. अंकिताचे लग्न होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे.

तामणे-लोलये येथील मायलेकीच्‍या मृत्‍यूचे कोडे अजूनही पोलिसांना उलगडलेले नाही. गीता आनंद पागी हिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र तिची सावत्र विवाहित मुलगी अंकिता प्रकाश पोळजी हिने आत्‍महत्‍या का केली, हा प्रश्‍‍न अनुत्तरीतच आहे. तिच्‍या मृतदेहाची चिकित्सा मडगावच्‍या हॉस्पिसियो इस्पितळात करण्यात आली, अशी माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो व उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली. काणकोणचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT