Crime Scene  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: सीबीआय तपासासाठी हालचाली

हलगर्जीपणामुळे पुरावे नष्टच; त्रुटी सुधारण्‍यासाठी सरकारसमोर दोनच पर्याय

दैनिक गोमन्तक

हळदोणे: सिद्धी नाईक मृत्‍यूप्रकरणाचे (Murder Case) गूढ दिवसेंदिवस वाढतच आहे. आता शवचिकित्‍सा अहवालाचा तज्‍ज्ञ समितीकडून फेरआढावा आणि ‘सीबीआय’ (CBI) चौकशी हे दोनच पर्याय सरकारसमोर (Goa Government) उपलब्‍ध आहेत. डॉक्‍टरांनी केलेल्‍या शवचिकित्‍सेबाबतच्‍या हलगर्जीपणामुळे तपासासाठी आवश्‍‍यक अनेक पुरावे आता नष्‍ट झाले आहेत.

त्‍यामुळे तयार केलेला शवचिकित्‍सा अहवाल चार न्‍यायवैद्यक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या मदतीने नव्‍याने फेरअहवाल बनविला जाऊ शकतो. गोवा पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाच्‍या तपासामध्‍ये केलेल्‍या त्रुटी भरून काढण्‍यासाठी हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे देण्‍याच्‍या हालचालीही सुरू झाल्‍याची माहिती मिळाली आहे.

जस्टीस फॉर सिध्दी नाईक मोहिम

आपल्‍या ग्रामक्षेत्रात सिद्धी नाईकवर घडलेले अघटित हे अत्‍यंत वाईटच आहे. अशा घटनेची राज्‍यातच नव्‍हे, तर देशात कुठेही पुनरावृत्ती होऊ नये. त्‍यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून नाईक कुटुंबियांना न्‍याय द्यावा. सिद्धीच्‍या मृत्‍यूचेही नेमके कारण स्‍पष्‍ट व्‍हावे व पारदर्शकपणे पोलिस चौकशी व तपास व्‍हावा अशी मागणी मयडेचे सरपंच गोविंद गोवेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT