Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कळंगुट पोलिसांचा हलगर्जीपणा

पिडीत तरूणीच्या वडीलांनी दाखल केली तक्रार

दैनिक गोमन्तक

नाश्नोळा हळदोणा येथील सिध्दी नाईक यांचा संशयास्पद मृत्यू हा खुनाचा प्रकार असून सिध्दीचे वडील संदीप नाईक यांनी याबाबतीत खुनाची तक्रार कळंगुट पोलिसांत दाखल केली आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत बायलांचो एकवोटच्या श्रीमती आवडा वियेगश उपस्थित होत्या. या संशयास्पद मृत्यूचा तपास संथपणे चालल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संशयास्पद मृत्युबाबतीत कळंगुट पोलिस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सिध्दीचे वडील संदीप नाईक यांच्याकडून आपल्या तक्रारीत केला आहे.

सिद्धी नाईक हिच्या मृत्युप्रकरणी वेगवेगळ्या दोन पोलिस स्थानकातून होत असलेला तपास, जबानीत विसंगती व सखोल चौकशीसाठी समाजातून होणारी मागणी यामुळे या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अनुभवी व वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडे ते दिले जाण्याची शक्यता आहे. विविध समाज घटक व आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाचा विरोधकांकडून वाढत चाललेल्या आक्रमकतेमुळे सरकारकडून सावध पावले उचलण्यात येत आहेत.

दरम्यान, सिद्धी नाईक हिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता. त्यावेळी पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षक यापैकी कोणीही घटनास्थळी गेले नाहीत. एका अननुभवी महिला उपनिरीक्षकाला त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी शव चिकित्सा झाल्यानंतर पोलिस सर्जनने (डॉक्टर) तिचा मृत्यू बुडून झाल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT