Goa Muncipal Election 2021 Covid patients will be able to cast their votes from 4 pm to 5 pm
Goa Muncipal Election 2021 Covid patients will be able to cast their votes from 4 pm to 5 pm 
गोवा

Goa Muncipal Election 2021: गोव्यात लसीकरण नाही निवडणूक महत्त्वाची? जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोवा पालिका निवडणुकीत दुपारी 4 ते संध्याकाळी 5 यावेळेत कोविड रुग्णांना मतदान करता येणार आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी अशा कोविड रुग्ण मतदारांचे सर्वेक्षण केले असून त्यांना पीपीई कीट घालून मतदानासाठी येण्यासाठीची व्यवस्था राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

कोविड महामारीने पुन्हा डोके वर काढले असतानाच म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे पालिका मंडळे निवडण्यासाठी आज मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदारांकडून कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी फेसशिल्ड, मास्क व हातमोजे पुरवण्यात आले आहेत. मतदाराच्या बोटाला शाई लावणे आणि मतदाराची मतपत्रिकेच्या एका भागावर सही घेणे या दरम्यान मतदारापासून शक्य तितक्या दूरवर राहून हे काम करावे, अशी सूचना कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे.

बहुतांश मतदान केंद्रे ही बंद इमारतीच्या स्वरुपात असल्याने आयोगाने तेथे निर्जुंतुकीकरण न करणेच पसंत केले आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्यांना मतदान करता येणार नाही. अशा मतदारांना मास्क परिधान करण्यासाठी परत पाठवावे, अशी सूचना मतदान केंद्रावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना आयोगाकडून करण्यात आली आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांग करताना एकमेकांना चिकटून उभे राहू नये, त्यांनी पुरेसे शारीरिक अंतर पाळावे याची दक्षता घेतली जाणार आहे.

कोविडचे रुग्ण येण्यास सुरवात होण्यापूर्वी मतदान केंद्रातील इतर मतदार निघून गेलेले असतील याची दक्षता घेतली जाणार आहे. पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारासही इतर सर्व प्रक्रियांना इतर मतदारांप्रमाणेच सामोरे जावे लागणार आहे.

पालिका निवडणुकीचे कारण पुढे करून मडगाव परिसरातील क्षयरोग रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा प्रकार आज घडला होता. गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक या आज सकाळी त्या केंद्रावर कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी गेले असता त्या इमारतीचे फाटक बंद असल्याचे त्यांना दिसले. तेथे पालिका निवडणुकीमुळे लसीकरण बंद राहील, अशी नोटीस चिकटवण्यात आली होती. तेथे अन्य शंभरेक नागरिकही लस घेण्यासाठी आले होते. नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, दुपारी चार वाजण्याच्या पूर्वी लस घेण्यासाठी येऊ शकता, असा निरोप त्यांना देण्यात आला. 



 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

Chhattisgarh Naxalites Encounter: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरुच!

SCROLL FOR NEXT