Goa Mine Dainik Gomantak
गोवा

Mulgao Mine: खाण लीजबाबत आम्हाला अंधारात ठेवलं, आता गावावर नांगर फिरवू देणार नाही..

न्यायालयात जाण्याचा मुळगाववासीयांचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही, तर खाणीमुळे गाव उद्‌ध्वस्त होत असेल, तर त्याला आमचा विरोध असणार. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येईल, असा इशारा मुळगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

खाण लिजमधून मुळगावमधील घरे, शेती बागायती आणि धार्मिक स्थळे वगळावीत, अशी मागणीही आज (शनिवारी) मुळगाव पंचायतीत झालेल्या ग्रामसंस्थांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.

सरपंच तृप्ती गाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणप्रेमी रमेश गावस आणि सॅबी रॉड्रीग्स यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस पंचायत मंडळासह देवस्थान समिती, कोमुनिदाद मंडळ, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर आणि नागरिक उपस्थित होते.

गावाच्या हिताचा विचार करून न्याय मिळेपर्यंत सर्वांनी एकसंध राहून लढा चालूच ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते, अशी माहिती सरपंच तृप्ती गाड यांनी दिली. मात्र अधिकारी अनुपस्थित राहिल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस उपसरपंच गजानन मांद्रेकर, विशालसेन गाड, मानसी कवठणकर आदी पंचसदस्यांसह शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, देवस्थान समितीचे वसंत गाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र नैसर्गिक जलस्रोते, शेती बागायती आणि गावावर नांगर फिरवून गाव उद्‌ध्वस्त करू नका, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी करून, न्याय मिळेपर्यंत ग्रामस्थांचा लढा चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

डिचोली खाण ब्लॉक अंतर्गत खाण व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची सर्वाधिक झळ मुळगाव गावाला बसणार आहे. मुळगावची परंपरा आणि वैभव नष्ट होणार आहे.

खाण लीजबाबत मुळगाववासियांना अंधारात ठेवण्यात आले आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष वसंत गाड यांनी सांगून गाव संकटात येत असेल, तर आमचा खाणीला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

खाण व्यवसायाबद्दल ग्रामस्थ जो निर्णय घेतील. तो पंचायत मंडळाला मान्य असल्याचे सरपंच तृप्ती गाड यांनी सांगितले.

...तर गावावर संकट

खाण व्यावसायामुळे मुळगाव गावातील नैसर्गिक जलस्रोत असलेल्या सर्वात मोठ्या तळ्याचे अस्तित्व आधीच संकटात आले आहे. खाण लीजनुसार खाण व्यवसाय सुरू झाल्यास भविष्यात मुळगाववासियांना पाणी मिळणे मुश्कील होणार. संपूर्ण गाव उद्‌ध्वस्त होण्याची भीती आहे. लीज देताना सरकारने या परिणामांचा अजिबात विचार केलेला नाही.

- रमेश गावस, पर्यावरणप्रेमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT