Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

Sadanand Shet Tanavade MPLADS: गोव्यातील जनतेने तानावडे यांची निवड गोव्याच्या हितासाठी केली आहे, उत्तर प्रदेशातील विकासकामांना निधी पुरवण्यासाठी नव्हे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आपल्या ‘एमपीएलएडीएस’ निधीतून ४८.६० लाख रुपये उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे एलईडी हायमास्ट दिवे उभारण्यासाठी मंजूर केले आहेत. या प्रकारावरून काँग्रेसने तानावडे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गोव्यातील अनेक महत्त्वाची विकासकामे प्रलंबित असताना गोव्याच्या निधीचा वापर दुसऱ्या राज्यासाठी करणे, हा गोमंतकीयांची विश्वासघात आहे.

पणजीकर म्हणाले की, गोव्यातील जनतेने तानावडे यांची निवड गोव्याच्या हितासाठी केली आहे, उत्तर प्रदेशातील विकासकामांना निधी पुरवण्यासाठी नव्हे. गोव्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, क्रीडा सुविधा, समाज मंदिरे, रस्ते, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांना निधीची नितांत गरज असताना ‘एमपीएलएडीएस’ निधी राज्याबाहेर वळवणे म्हणजे हा येथील जनतेवर अन्याय आहे.

खासदार म्हणून तानावडे यांची ‘एमपीएलएडीएस’ निधीच्या वापराबाबतची कामगिरीही अत्यंत निराशाजनक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मंजूर केलेल्या २९ प्रकल्पांपैकी केवळ ६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्णत्वाचे प्रमाण अवघे १७.१ टक्के आहे. तसेच निधीचा वापर केवळ १९.४ टक्के झाला आहे. ही आकडेवारी सार्वजनिक निधीच्या अपुऱ्या वापराची, चुकीच्या प्राधान्यक्रमांची आणि गोव्याच्या विकासाबाबतच्या उदासीनतेची साक्ष देते.

- अमरनाथ पणजीकर

कोठेही नियमभंग नाही : तानावडे

तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कोठेही नियमभंग केला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, लोकसभा खासदार आपल्या मतदारसंघाच्या बाहेर खासदार निधी वापरू शकत नाही; पण ती मुभा राज्यसभा खासदाराला असते. राज्यसभा खासदार वर्षातून एकदा जास्तीत जास्त ५० लाख रुपयांची मदत राज्याबाहेर करता येते. टीका करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. खासदार निधी व्यवस्थापन करणारी यंत्रणा असते. ती प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निधी उपलब्ध करते. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने मदत करताच येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT