सकाळी कारवाई केलेल्या भाजी मार्केटमध्ये संध्याकाळी पुन्हा अतिक्रमणाने भाजी मार्केट असे व्यापले. Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरगाव मार्केटमध्ये सकाळी कारवाई, सायंकाळी पुन्हा अतिक्रमण

दोन वर्षांपूर्वी एका तियात्रिष्टाचा या अतिक्रमणामुळे बळी गेला होता. मात्र पालिका अजून निद्रीस्त असून हप्ता वसूल करण्यास पालिका पुढे असल्याचे बोलले जाते. पण मात्र त्यांच्याकडे कारवाई होत नाही.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुरगाव (Murgaon) पालिका मार्केट समितीतर्फे (Market Committee) गुरुवार (दि.२) भाजी मार्केटमध्ये अतिक्रमणविरोधात धडक कारवाई (action against encroachment) करण्यात आली. मात्र संध्याकाळी परिस्थिती जैसे थे झाली असून, भाजीवाल्यांचे पुन्हा तेथे अतिक्रमण (enchroachment) केले आहे.

वास्कोतील भाजी मंडी म्हणजे अतिक्रमणाचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. भाजी दुकानदार आपले दुकान सोडून भर रस्त्यावर आपला व्यवसाय थाटत असल्याने यात मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुरगाव पालिकेला न जुमानता त्यांचा व्यवसाय थाटात सुरू असतो. पालिकेचे कर्मचारी त्यांना सहकार्य करत असल्याच्या अनेक तक्रारी आहे. पालिका अधिकारी तसेच नगराध्यक्ष नगरसेवक एक दिवस धडक कारवाई करतात मात्र नंतर सर्व निद्रिस्त होतात. त्यामुळे भाजीवाल्यांचे आयतेच फावते नंतर कारवाई होत नसल्याने मार्केटमधील परिस्थिती जैसे थे होत असते. हम करे सो त्यांचा मनमानीपणा चालू असतो. पालिकेचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. प्रत्येक नवीन पालिका मंडळ एकदाच कारवाई करतात. नंतर ते थंड होतात.

दरम्यान गुरुवारी सकाळी मुरगाव पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष नगरसेवक माताईश मोंतेरो तथा नगरसेवक प्रजय मयेकर, नगरसेवक दिलीप बोरकर यांनी मार्केटमध्ये अचानक अतिक्रमणाचा विरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर दुकानदारांनी आपला व्यवसाय भर रस्त्यात थाटून व्यापार करत असताना ते दिसले. त्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान संध्याकाळी जैसे थे परिस्थिती दिसली. संपूर्ण भाजीमार्केट पुन्हा अतिक्रमणाने व्यापलेले दिसले. तेव्हा सदर कारवाई नावापुरतीच असल्याचे बोलले जाते. दरम्यान मुख्य रस्त्यावरील फळविक्रेत्यांनीही आपला व्यवसाय भररस्त्यात थाटला असून यावर पालिकेने दुर्लक्ष केले आहे. एफएल गोम्स हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरून शेकडो वाहनांची रहदारी चालू आहे. पादचारी या रस्त्यावरून ये-जा करतात फळविक्रेते त्यांच्या या अतिक्रमणामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता टाळता येत नाही. दोन वर्षांपूर्वी एका तियात्रिष्टाचा या अतिक्रमणामुळे बळी गेला होता. मात्र पालिका अजून निद्रीस्त असून हप्ता वसूल करण्यास पालिका पुढे असल्याचे बोलले जाते. पण मात्र त्यांच्याकडे कारवाई होत नाही. त्यामुळेच फळविक्रेत्यांचे पालिकेच्या आशीर्वादाने अतिक्रमण करून व्यवसाय तेजीत चालत आहे असे नागरिकांकडून सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT