Morjim Beach | Goa Party Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: रेव्ह पार्टी विरुद्ध गुन्हा नोंदवून '48' तास उलटले; तरी आयोजकांच्या अटकेसाठी टाळाटाळ

Goa Party: ‘त्या’ व्यक्तीला राजकारण्यांचे अभय आणि आशीर्वाद असल्यानेच कारवाईसाठी पोलिस हतबल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Party: रात्री 10 नंतरही संगीतरजनी पार्टी सुरू ठेवल्याप्रकरणी आश्‍वे-मोरजी येथील मार्बेला बीच रिसॉर्टच्या रेव्ह पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून 48 तास उलटून गेले आहेत. मात्र, तरी आयोजकांना अटक करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. ‘त्या’ व्यक्तीला राजकारण्यांचे अभय व आशीर्वाद असल्यानेच कारवाईसाठी पोलिस हतबल झाले आहेत. पार्टीबाबत तक्रारी येऊनही राजकीय दबावानेच कारवाईला विलंब केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या संगीत पार्ट्यांची यादी उच्च न्यायालयात ॲड. कार्लोस फेरेरा यांनी दिली होती. त्यात मार्बेला रिसॉर्टचाही समावेश होता. त्यामुळे यासंदर्भाची माहिती पोलिस खात्याला तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही होती. पण पोलिसांनी उशिरा कारवाई केली.

पोलिसांनी जाणीवपूर्वक उशिरा कारवाई केली, पण पुढे काय?

पोलिसांनी पार्टीवेळी संगीताची उपकरणे जप्त केली आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा व ध्वनी प्रदुषण नियम उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कलमांखालील गुन्हा गंभीर नाही.

आयोजक न्यायालयात जप्त करण्यात आलेली उपकरणे दंड जमा करून सोडवतील. आयोजकांनी ही रेव्ह पार्टी आयोजित करून आपले काम साधले. आता कारवाई झाली तरी ते त्याला सामोरे जाण्यास तयार आहेत.

या कायद्याखाली असलेली कारवाई कठोर नसल्यानेच अशा आयोजकांचे फावले आहे व त्याला सरकारचेही अप्रत्यक्षपणे संरक्षण असल्यानेच त्यांना हे धाडस होत आहे. पार्टीविरोधात पोलिसांनीच स्वतःहून कारवाई केल्यास या प्रकारांना आळा बसेल.

दोन डान्स बार सील

कळंगुट पंचायत मंडळाने सोमवारी रात्री खैब्रावाडा-कळंगुट येथील थ्री किंग्ज प्रिमियम आणि डेविल नावाच्या दोन डान्स बारला सील ठोकले. ही कारवाई अशीच सुरू राहाणार असल्याचे सरपंच जोजेफ सिक्वेरा यांनी सांगितले.

नाममात्र कारवाई

मार्बेला बीच रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयोजकाला सरकारी पातळीवर फूस होती. त्यामुळेच तो हे धाडस करत शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू ठेवण्यात यशस्वी ठरला. ही कारवाई नाममात्र आहे.

तक्रारीसाठी संपर्क क्रमांक

रात्री 10 नंतर विशेषतः किनारपट्टी परिसरातील मोकळ्या जागेतील संगीतरजनी पार्ट्या करण्याचा आदेश आहे. त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणेला दिले आहेत.

दरम्यान, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी भरारी पथक तसेच ध्वनी प्रदूषणच्या तक्रारीसाठी उत्तर गोवा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचा मोबाईल क्रमांक 7875756117 आहे. भरारी पथकात एक उपअधीक्षक, एक निरीक्षक व एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT