Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळावर कंपनीचा अनागोंदी कारभार; कामगारांचा एल्गार

Mopa Airport: कर्मचाऱ्यांना डीए, पीफ, सॅलरी इन्क्रिमेंट याबाबत कोणतीच माहिती मिळत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केली.

Ganeshprasad Gogate

Mopa Airport: मोपा विमानतळावरील कामगारांना डीए, पीफ सारख्या सुविधांबाबत सीएलआर कंपनी कोणतीच माहिती पुरवत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय.

काँग्रेस नेते आणि ॲड जितेंद्र गावकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून HR कडे संपर्क साधला असता त्यांनी 4 जानेवारीला संबंधित प्रश्नी चर्चा करण्याची सहमती दर्शवली आहे.

मोपा विमानतळावर CLR कंपनीमार्फत विविध पदांसाठी 80 कामगारांची भरती करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना डीए, पीफ, सॅलरी, घर भाडे, साप्ताहिक सुट्ट्या, इन्क्रिमेंट याबाबत कोणतीच माहिती मिळत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केली.

या गोष्टींसाठी HR कडे संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा प्रकार घडत असल्याचे कर्मचाऱ्यांनी संगितले.

वारंवार हे प्रकार घडत असल्याने कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते ॲड जितेंद्र गावकर यांच्याशी सम्पर्क साधल्यावर त्यांनी या प्रश्नला वाचा फोडली.

HR कडे संपर्क साधला असता त्यांच्याकडे कोणतीही अथोरिटी नसल्याचे दिसून आलेय. कामगारांना पहिल्या महिन्यात सर्व सुविधा, चार्जेस देण्यात ले मात्र नंतरच्या महिन्यात त्यांच्या सॅलरी स्लिपवर ESI, Insurance चे पैसे देण्यात आले नसून त्याऐवजी ADM चार्जेस लावून प्रत्येक कामगारांचे 18 रुपये कट केल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे 'हे कसले चार्जेस', असं विचारल्यावर HR कडून कोणतेच उत्तर मिळत नाही. त्यामुळे कंपनीचा मॅनेजर अविनाश पारखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर चर्चा करण्यासाठी 4 जानेवारीला बोलावण्यात आलेत असल्याचे गावकर म्हणाले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यातील मुलांना मोपा विमान तळावर नोकरीच्या संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात या उलट चित्र असून कंपनीत जी मुलं काम करतात त्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे गावकर म्हणाले.

मोपा विमानतळावर सध्या कामगारांचा जो प्रश्न सुरु आहे त्यासंबंधी जर का तोडगा निघाला नाहीच तर आम्ही हा प्रश्न GMR कडे मांडणार असल्याचेही गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT