Cyclone | Goa Monsoon Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: गोव्यात पाऊस लांबणार? अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात बदलाची शक्यता

जून महिना उजाडला तरी गोव्यात उन्हाच्या झळा कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Updates: जून महिना उजाडला तरी गोव्यात उन्हाच्या झळा कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय उपखंडातील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज (सोमवार 5 जून) रोजी दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील 48 तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप बेटांच्या क्षेत्रामध्ये दक्षिणेला लागून असलेल्या तीव्रतेपासून अत्यंत तीव्र संप्रेषणासह तुटलेले कमी आणि मध्यम ढग पसरलेले आहेत. पुढील 120 तासांमध्ये हे चक्रीवादळाची घोंघावणार आहे.

पाऊस लांबणार..?

हवामान खात्याने मॉन्सून 4 जून रोजी केरळात दाखल होईल, अशी शक्यता यापूर्वी व्यक्त केली होती. मात्र, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

याचा परिणाम मॉन्सूनच्या केरळमधील आगमनावर होणार असून त्यानंतरच पुढील वाटचाल निश्चित होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे मॉॅन्सून काही दिवस लांबू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT