Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

गोवा(Goa) किनारपट्टी भागात 8 जुलैपासून पाउस पडण्याची शक्यता हवाामान विभागाने वर्तविली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) राज्यात सोमवारी दिवसभर पावसाने दडी मारली. केवळ कांही भागात तुरळक सरी बरसल्या. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता नसली तरी गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. पण, पूर्ण दिवस पावसाने दडी मारली. राज्यात 22.5 मी. मी. पावसाची नोंद झाली. मंगळवार आणि बुधवारी पावसाची शक्यता नाही. त्यानंतरचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे. (Goa Monsoon Update:Two days of torrential rain forecast)

दरम्यान देशातील किनारपट्टी भागात 8 जुलैपासून पाउस पडण्याची शक्यता हवाामान विभागाने वर्तविली आहे. बर्‍याच राज्यात हा मान्सून पोहोचला आहे, अशी अनेक राज्ये आहेत जे अद्यापपर्यंत मान्सूनच्या सरींमध्ये भिजले नाहीत. ओडिशाच्या अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम आणि मिझोरममध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्येही पाऊस पडत आहे. बिहारमध्येही मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सून अद्याप युपीच्या काही भागात पोहोचलेला नाही. याशिवाय मान्सूनने छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या अनेक भागात पाऊस हजेरी लावली आहे.

ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 जुलैपासून बंगालच्या उपसागरापासून पूर्वेकडे वाहणारे कमी दाबाचे वारे हळूहळू पूर्व भारताच्या काही भागात पोहचणार आहेत. ज्यामुळे देशातील ज्या भागात अद्याप मान्सून झाला नाही अशा भागातही पाऊस पडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT