Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा; आजपासून दोन दिवस ऑरेन्ज तर, मंगळवारपासून यलो अलर्ट

गोव्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon Update: गोव्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. पुढील काही दिवस देखील राज्यात पाऊस दमदार बॅटिंग करणार असल्याचे दिसत असून, गोवा हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस ऑरेन्ज तर मंगळवार (दि.27) पासून यलो अलर्ट जारी केला आहे.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यात आज मध्यम ते हालक्या स्वरूपाचा पाऊस पडला. राज्यातील काणकोण येथे 12 सेंमी, सांगे 09 सेंमी , म्हापसा येथे 07 सेंमी पावसाची नोंद झाली. तर, फोंडा आणि साखळीत 06 सेंमी, दाबोळी, पणजी आणि केपे येथे प्रत्येकी 05 सेंमी आणि पेडणे, मडगाव आणि मुरगाव येथे प्रत्येकी 04 सेंमी पावसाची नोंद झाली.

येत्या पाच दिवसांत

उत्तर आणि दक्षिण गोव्यात 24 ते 28 या काळात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 25 आणि 26 दिवस पावसाचा जोर अधिक असेल असेही हवामान खात्याने म्हटल आहे.

दरम्यान, या काळात महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर 40 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असेही खात्याने म्हटले आहे. याकाळात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT