गोवा

Goa Monsoon Update: गोव्यात 28 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

कर्नाटक, बिहारमध्येही पडणार जोरदार पाऊस

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: राजस्थानातून मॉन्सूनने परतीला एक आठवडा उशिराने सुरवात केलेली असली तरीही 28 सप्टेंबरपर्यंत गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्राचा कोकण भाग, बिहार येथे मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मॉन्सूनच्या परतण्यास सुरवात झालेली असल्याने वायव्य भारत आणि लगतच्या पश्चिम-मध्ये भागात पावसाचा जोर कमी होणार आहे. तथापि, 28 सप्टेंबरपर्यंत विविध राज्यात पाऊस झोडपू शकतो.

त्यात बिहारमध्ये तर 25 सप्टेंबर रोजीदेखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 25 ते 28 सप्टेंबर या काळात अंदमान निकोबार बेटे, कर्नाटक किनारपट्टी, महाराष्ट्र किनारपट्टी, गोवा येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.

27 सप्टेंबरला मराठवाड्यात, 27 आणि 28 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात आणि 28 सप्टेंबरला कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस होईल. तर

30 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. ते पुढे वायव्येकडे सरकत येईल. दरम्यान, देशात 30 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनचा हंगाम संपुष्टात येईल, असे आयएमडीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT