Aamthane Dam Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam Update : आमठाणे धरण अखेर ‘फुल्ल’

50 मीटरची क्षमता : ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता वाढली

गोमन्तक डिजिटल टीम

Amthane Dam Update : आज, उद्या करता-करता अखेर ‘आमठाणे’ धरणाने क्षमतेपर्यंतची पातळी गाठली असून, हे धरण ‘फुल्ल’ झाले आहे. सध्या असलेला पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन दिवसांत हे धरण ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता वाढली आहे. ५० मीटर ही या धरणातील जलसाठ्याच्या पातळीची क्षमता आहे.

गेला आठवडाभर पडलेल्या कोसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होताना रविवारी (ता.२३) रात्रीच पाण्याने क्षमता पार केली आहे.

आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर जलसाठ्याच्या पातळीची क्षमता ५० मीटर एवढी आहे. आमठाणेचा जलसाठा वाढल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या खासकरून उत्तर गोव्यातील जनतेसाठी ही सुखद घटना आहे.

आठवडाभर उशीर

गेल्यावर्षी मॉन्सून वेळेवर सक्रिय झाला होता. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आमठाणे फुल्ल झाले होते. यंदा मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जलसाठ्यात वाढ झाली नव्हती.

यावर्षी पाऊस उशिरा सक्रिय झाल्याने आमठाणे धरण भरण्यास आठवडाभर उशीर झाला. गेल्या गुरुवारपर्यंत जलसाठा ४९ मीटरच्या जवळपास पोहोचला होता. मात्र, आता हे धरण पूर्णपणे भरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT