Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rainfall: राज्यात 7 दिवसात बरसला 392 मिलीमीटर पाऊस; आजही ऑरेंज अलर्ट

गोव्यासह कोकण किनारपट्टीला झोडपले

Akshay Nirmale

Goa Monsoon Update: गोव्यामध्ये जून महिन्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये गायब झालेल्या पावसाने जूनच्या शेवटाकडे येताना चांगलाच जोर धरला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये राज्यात एकूण 392 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 23 जूनपासुनच्या सात दिवसातील ही आकडेवारी आहे.

(IMD Goa)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत गोव्यासह कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे. आज, शुक्रवारी देखील भारतीय हवामान विभागाने गोव्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात शुक्रवारी जोरदार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

या आठवड्यातील पाऊसमानाचा विचार करायचा झाल्यास बुधवारी सकाळी हंगामातील सर्वाधिक 146 मिमी पाऊस झाला. त्यानंतरच्या 24 तासात म्हणजे गुरूवारी सकाळी राज्यात सरासरी 56.1 मिमी पावसाची नोंद झाली.

या जोरदार पावसामुळे गुरुवारी सकाळी मान्सूनची तूट 39 टक्के टक्क्यांवरून 35.1 टक्क्यांवर आली. तर बुधवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाने पावसाती तूट 54 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत कमी झाली. या हंगामात जून मधील एकूण पाऊस आता 565.7 मिलीमीटर झाला आहे. तर एरवी गोव्यात या काळात 871.8 मिलीमीटर पाऊस पडत असतो.

गोव्यातील पेडणे (75.8 मिमी), फोंडा (75.4 मिमी), सांगे (70.2 मिमी) आणि मडगाव (68 मिमी) येथे अतिवृष्टीची नोंद झाली. इतर केंद्रांपैकी पणजीमध्ये 61.2 मिमी (बुधवारी 202.9 मिमीच्या तुलनेत), काणकोण येथे 55.6 मिमी, ओल्ड गोवा येथे 48 मिमी, मुरगाव येथे 46 मिमी आणि इतर केंद्रांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला.

दरम्यान, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात मध्यम ते अति मुसळधार पावसाचा अंदाज गोवा वेधशाळने वर्तवला आहे. शुक्रवारी 30 जूनसह आगामी जुलै महिन्यातील पहिल्या तीन दिवसांसाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT