Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: कोठीवाडा-कारापूरमध्ये घरावर कोसळले भलेमोठे फणसाचे झाड; पडझडीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: गोव्यात 26 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

ग्रामीण भागात पडझडीच्या घटना वाढल्या असून यामुळे जीवितहानीचा धोकाही वाढला आहे.

माहितीनुसार, आज सकाळी अशीच एक घटना कोठीवाडा येथे घडली आहे. कोठीवाडा-कारापूर येथे मंगळवारी पहाटे दोन घरांवर भलेमोठे फणसाचे झाड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेत घरांसह दुचाकी आणि तुळशी वृंदावनाची मोडतोड झाली आहे. यामध्ये वित्तहानी वगळता अन्य कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पावसामुळे होणाऱ्या या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, काल अशीच एक घटना शिवोली येथे घडली. मार्ना-शिवोली येथे सोमवारी संध्याकाळी सरीता च्यारी यांच्या कौलारू घरावर भलेमोठे आंब्याचे झाड वादळी वाऱ्याने कोसळल्याने घरात शिकवणीसाठी आलेले चार विद्यार्थी अंगावर कौले पडल्याने जबर जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT