Goa Monsoon Update 2023 | Tree Uprooted  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पावसामुळे झाड कोसळून बोरीत कारचे नुकसान; तर म्हापशात वीज पुरवठा खंडित

पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी

Kavya Powar

Goa Monsoon Update 2023: गोव्यात 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने राज्यभरात थैमान घातले आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या पडझडींमुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

मोटये बोरी येथे फणसाचे झाड उन्मळून दीपक प्रभुदेसाई यांच्या कारवर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यामध्ये हजारोंची आर्थिक हानीही झाली आहे. दरम्यान, अग्नीशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी गाडीवर पडलेले झाड हटवले आहे.

दुसरीकडे, आज म्हापसामध्येही अशीच घटना घडली आहे. धुळेर-म्हापसा रोडवर कृषी विभागाच्या शेतातील एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आनंदी अपार्टमेंटजवळ सदर घटना घडली असून, यामध्ये विजेच्या तारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, यामुळे भागातील वीजपुरवठा खंडित झाला. संबंधित गोष्टीची माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरून झाड हटवण्याचे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी

मुसळधार पावसाने अविश्रांतपणे सुरू केलेल्या फटकेबाजीमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागांत पाणी साचल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून रात्रभर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदीकाठच्या लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो.

अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पडझड आणि नुकसानीचे सत्र सुरूच आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT