Goa Monsoon Update: धुव्वाधार पावसाने राज्यात थैमान घातले असून ठिकठिकाणी पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोठमोठी झाडे घरांवर, वाहनांवर कोसळण्याचे प्रकार वाढले आहे. मुसळधार पावसामुळे मडगाव आरोग्य केंद्राचा काही भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे.
माहितीनुसार, पावसामुळे मडगाव अर्बन हेल्थ सेंटरचा काही भाग पहाटे 3 वाजता कोसळला. त्या बाजूच्या भिंतीला लागूनच पार्क केलेली एक बाईक पूर्णत: खराब होऊन गाडीचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरोग्य विभागाची ही इमारत 1961 मध्ये बांधली गेली आहे.
दुसरीकडे, पावसामुळे नेरूळमध्येही जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री आंब्याचे झाड उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे झाड तिथेच असलेल्या काही दुचाकी, कार आणि इलेक्ट्रिक पोलवर कोसळले. या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे संगण्यात येत आहे.
या घटना वाढल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७९.६ मि.मी म्हणजेच ३.१३ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत एकूण १,२७१.६ मि.मी (५०.६ इंच) पावसाची बरसात झाली आहे. खरे तर १५ दिवसांपूर्वी राज्यात ५० टक्के पावसाचा तुटवडा होता. तो भरून काढत अतिरिक्त ९.८ टक्के पावसाची बरसात झाल्याने राज्यासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.