Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: विजांच्या गडगडाटांसह परतीच्या पावसाने राज्याला पुन्हा झोडपले

Goa Rain: गोवा राज्यात काल पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.

दैनिक गोमन्तक

Goa Rain: राज्यात काल पावसाने पुन्हा हजेरी लावली. संध्याकाळी 4.20 च्या सुमारास वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा हाहाकार सुरुच असून, अनेक ठिकाणच्या नरकासुराच्या प्रतिमा भिजण्याबरोबरच शेतीचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणची भातशेती आडवी झाली. आजही राज्यात तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

दरम्यान, विदर्भातील काही भागांतून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागातूनही पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शनिवारपर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्य बंगालच्या उपसागरातून परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT