Goa Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Red Alert: गोव्यात दोन दिवस 'रेड अलर्ट'; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Goa Weather Update: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोव्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोव्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. एकीकडे दरडी कोसळून वाहतूक बंदी झाली आहे तर दुसरीकडे पडझडीच्या घटना सातत्याने समोर येतायेत.

यातच आज, गोव्यात हवामान खात्याने आज (गुरुवारी, 18 जुलै) रेड अलर्ट वर्तवला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, रेड अलर्ट हा आज 18 (जुलै) आणि उद्या (19 जुलै) असणार आहे. दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, 20, 21 आणि 22 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. रेड अलर्ट हा आज 18 (जुलै) आणि उद्या (19 जुलै) असणार आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून लोकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

आज रेड अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील एक ते तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रासह दक्षिण आणि उत्तर गोव्यावर (North Goa) सध्या पावसाचे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या 24 तासात पावसाची नोंद

गेल्या चोवीस तासांत साखळी, म्हापसा, पेडणे, फोंडा (Ponda) आणि राजधानी पणजीत पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. राज्यात सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही-काही ठिकाणी लोकांच्या घराममध्ये पाणी शिरले आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

Goa Live News: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT