Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: जागोजागी पडझड: नुकसानीच्या घटनांत वाढ

अतिवृष्टीचा परिणाम : लोकांमध्ये घबराट, अग्निशमन दलाचे जवान रात्रंदिवस कार्यरत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी आर्थिक नुकसान होण्याचे प्रकारही घडले. सुदैवाने या सर्व घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोरजी येथील घटनेत १५० वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड कोसळले. यावेळी कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. सत्तरीतील वेळूस भागात एक भलेमोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार घडला.

डिचोली तालुक्यात चार ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. साखळीतील म्हावळंगतड भागात एका घराचे यात थोडे नुकसान झाले.

फोंडा तालुक्यात एकूण पाच ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडले. जोरदार पावसामुळे राज्यभर नदी, नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सत्तरीत दळणवळणाला अडथळा

पावसामुळे सत्तरीतील विविध भागांत झाडांची पडझड सुरूच आहे. शनिवारी (ता.१) सकाळपासून सत्तरीतील विविध भागांत झाडांची पडझड झाली.

त्यात काहीकडे वाहतूक कोंडी झाली होती. तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, वाळपई अग्निशमन दल व वीजपुरवठा कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती काम हाती घेतले.

शुक्रवारी उत्तररात्री १.४५ वा. पर्ये येथील चेकपोस्टजवळ एक झाड रस्त्यावर पडले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी १२ वा. पाली-जांभळीकडे येथे रस्त्यावर झाड उन्मळून पडले तर दुपारी नाणूस खान रेसिडेन्सी येथे आंब्याचे झाड रस्त्यावर पडण्याची घटना घडली.

वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांना घटनांची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. तसेच वीज खात्याने वीजवाहिन्यांचे तातडीने दुरुस्तीकाम करून वीजपुरवठा सुरळीत केला.

वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात जवानांनी मदतकार्य केले.

पाळोळेत दुकानावर वटवृक्ष कोसळला

पाळोळे येथे वडाचा वृक्ष कोसळून जवळच्या दुकानाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता.१) संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेला वृक्ष हटविला‌. वृक्ष विजेच्या तारांवर पडल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मागाहून वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT