Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात कोसळधार! दरड, झाडं कोसळून विविध ठिकाणी नुकसान

गेल्या 24 तासांत झालेल्या पावासामुळे राज्यातील विविध ठिकाणी दरड, झाडं कोसळून नुकसान झाले आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: राज्यात मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड होण्यासह विविध ठिकाणी पाणी साचणे यासह रस्ते खचण्याच्या घटना समोर येत आहेत. मागील दोन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावासाची नोंद झाली आहे. तसेच, येत्या चार दिवसात देखील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत झालेल्या पावासामुळे राज्यातील विविध ठिकाणी दरड, झाडं कोसळून नुकसान झाले आहे.

Goa Monsoon 2023

पणजीतील डॉन बॉस्को शाळेजवळील तारकर पेट्रोल पंपाजवळ झाड कोसळले आहे. यामुळे पंपाजवळ पार्क केलेल्या दुचाकीचे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम सुरू आहे.

साळगाव येथे एचपी गॅस गोदामाजवळ रस्तावर मोठे झाड कोसळले आहे. रस्त्यात पडलेले भेंडीचे झाड हटविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

नातालवाडो, नुवे येथे एका घरावर पहाटे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. मिंगेल बाप्तिस्त यांच्या घराचे यात मोठे नुकसान झाले आहे. मिंगेल यांच्या पत्नी देखील यात जखमी झाल्या आहेत.

डिचोली-साखळी रस्त्यावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले सुदैवाने यात दोन महिला बचावल्या आहेत. तसेच, पिळगावात घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. काणकोणात वीज खात्याचे पडझडीमुळे सहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय मडगाव पालिका इमारतीमध्ये गळती झाल्याने दस्तऐवजांना धोका निर्माण झाला आहे. तर, मुरगावमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT