Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

नदी नव्हे रस्ता! 2009 साली रहिवासी वाहून गेलेल्या आदीव्हाळ रस्त्यावर पुन्हा पावासाचे पाणी

पैंगीण ते गालजीबाग मार्गावरील आदीव्हाळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023: राज्यात सध्या पावासाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काणकोण तालुक्यात झालेल्या पावासामुळे पैंगीण ते गालजीबाग मार्गावरील आदीव्हाळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे.

मुसळधार पावसामुळे सकाळपासून आदीव्हाळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास हा रस्ता ओलांडणे वाहनचालक व पादचाऱ्यांना धोकादायक ठरू शकतो.

यापूर्वी 02 ऑक्टोबर 2009 मध्ये काणकोणात पूर आल्यावेळी याच रस्त्यावरून एक रहिवासी वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतांत तुडुंब पाणी भरले आहे. गालजीबाग नदीचे पाणी किनारा ओलांडून वाहू लागले आहे.

राज्यात आज ''रेड अलर्ट''

दरम्यान, गोवा हवामान खात्याने आज (गुरुवारी) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 09 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्यात ''रेड अलर्ट'' जाहीर केला होता. मात्र, गुरुवारीही हवामान खात्याचे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

राज्य नियंत्रण कक्ष 08322419550 | उत्तर गोवा 08322225383 आणि दक्षिण गोवा 08322794100 या नंबरवर संपर्क साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT