Paroda Bridge Submerged Dainik Gomantak
गोवा

Goa monsoon 2023 : पारोडा पूल पाण्याखाली, वाहतुकीसाठी मार्ग बंद

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Paroda Bridge Submerged

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा केपे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे मडगाव - केपे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

गुडी पारोडा पूल रात्रभर आणि सकाळपासून झालेल्या पावसामुळे पाण्याखाळी गेला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी पूल पाण्याखाली गेला असून, नागरिकांना वापरासाठी आणि वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

तसेच, पूलावर लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Paroda Bridge Submerged

गडनदी आणि तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली

राज्यात आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पेडण्यातील गडनदी आणि तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पेडण्यातील नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून सतर्क राहण्याबाबत एक संदेश पाठवण्यात आला आहे.

आज रेड आणि येत्या दोन दिवसांसाठी ऑरेन्ज अलर्ट

भारतीय हवामान खात्याने गोवा आणि कोकणात आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर, 22 ते 24 जुलै रोजी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात 115.6 ते 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT