Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात ऑरेन्ज अलर्ट, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात मागील दोन दिवसांपासून पावासाचा जोर ओसरला आहे. गुरूवारसाठी (दि.13) राज्यात गोवा हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट जारी केला असून, आज मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच, पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावासाची शक्यता आहे. यातकाळात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील.

तसेच, 14 आणि 17 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी बरसतील असा अंदाज गोवा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस पडला. जूनच्या तीस दिवसांत पडला नाही तेवढा पाऊस जुलैच्या आठ दिवसांत पडला. याकाळात राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड होण्यासाठी, पाणी साचणे आणि विविध दुर्घटना घडल्या.

त्यानंतर पावासाने थोडी उसंत घेतली आहे. गोवा हवामान खात्याने आज ऑरेन्ज अलर्ट तर येत्या चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT