Bogmalo Landslide Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : बोगमाळोत कोसळली दरड, फोंड्यात निखळले प्लास्टर; मुसळधार पावसाचा परिणाम

सुदैवाने जीवितहानी टळली

दैनिक गोमन्तक

goa monsoon 2023 : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असून ठिकठिकाणी पडझडीच्या घटना सुरूच आहेत. बोगमाळो येथे एका गॅरेजवर दरड कोसळली, तर फोंड्यातील मासळी मार्केटच्या स्लॅबचे प्लास्टर सोमवारी रात्री अचानक कोसळल्याने मासळी विक्रेते व ग्राहकांना धोका निर्माण झाला आहे.

बोगमाळो चर्चच्या मागे मंगळवारी पहाटे 6 वाजता दरड कोसळून धर्मगुरूंच्या चारचाकीचे तसेच चर्चच्या पुरातन वस्तूंचे नुकसान झाले.

सोमवारी मध्यरात्री सुमारे पावणे दोनच्‍या सुमारास पावसाच्या पाण्यासह बोगमाळो चर्चच्या मागे दोन मोठे दगड डोंगरावरून कोसळून खाली आले. त्यामुळे धर्मगुरूंच्या वाहनाचे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने धर्मगुरूंनी बाहेर येऊन पाहिले, तेव्हा गॅरेजमधील वाहनावर मोठा दगड स्थिरावलेला दिसला. तसेच

चर्चच्या पुरातून वस्तूंचेही नुकसान झाले. सरपंच संकल्प महाले यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वास्को अग्निशमन दलाचे जवानांनी दगड दूर केले.

दरम्यान, धोका अजून टळलेला नसून आणखी मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. त्‍यामुळे चर्चलाही धोका निर्माण झालाय. या परिसरात एक संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याचे त्‍यांनी सांगितले.

नव्या इमारतीची प्रतीक्षा

मासळी मार्केटच्या इमारतीला ३४ वर्षे झाली असून तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते या मार्केटचे उदघाटन झाले होते. त्यावेळी विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक हे फोंड्याचे आमदार होते.

३४ वर्षांनंतर या मार्केटची जुजबी दुरुस्ती केली होती. सध्या या मार्केटमधील अपुऱ्या जागेमुळे ग्राहकांना खरेदी करताना अडचणी येतात. त्यामुळे नवीन मासळी मार्केटच्या प्रतीक्षेत ग्राहक आहेत.

देशभरातील पावसात जूनमध्‍ये १० टक्‍के तूट

बिपरजॉय चक्रिवादळामुळे नैऋत्‍य मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला आणि पावसाने देश व्‍यापण्‍यास काहीसा विलंब झाला. जून महिन्‍यात संपूर्ण देशात १४८.६ मिमी पाऊस पडला, जो १९७१-२०२०च्या डेटावर आधारित १६५.३ मिमीच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा १०% कमी आहे. याच महिन्‍यात देशभरात सरासरी कमाल तापमान दहाव्या क्रमांकाचे सर्वोच्च (३४.६० डिग्री सेल्सिअस) आहे.

मडगाव, पणजीत ३ तास धुव्वाधार

हवामान खात्‍याने पुढील २४ तासांत अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे. राज्‍यात मंगळवारी रात्री ८ ते ११ या वेळेत मुसळधार पाऊस झाला. या कालावधीत मडगावात ४४ मिमी, तर पणजीत ४१.५ मिमी पर्जन्‍याची नोंद झाली. पेडणे येथे १६.५ मिमी, म्‍हापशात १५.५ मिमी पाऊस झाला.

पावसाचा जोर वाढणार : पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

मॉन्सून वारे बंगालच्या उपसागरात सक्रिय झाले असून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत चक्री वारे घोंगावत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. गुरुवारपर्यंत काही भागांत मुसळधार पाऊस पडणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर ५५ ते ७५ किमी प्रतितास वेगाने वारे घोंघावण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT