Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात पावसाने ओलांडली सरासरी; आत्तापर्यंत किती पाऊस पडला? जाणून घ्या...

अन निनो असतानाही राज्यात सामान्य पाऊस

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: अलीकडच्या काळात ऋतूचक्र बदलत चालले आहे, त्यामुळे पाऊस आता कधीही पडू शकतो. तरीही भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचा कालावधी मानला जातो. या काळाव्यतिरिक्त जो पाऊस पडतो तो अवकाळी समजला जातो.

तर रूढार्थाने अजून पावसाळा संपायला केवळ 9 ते 10 दिवस उरले आहेत. असे असतानाच गोव्यात पावसाने या हंगामात पावसाची सरासरी ओलांडली आहे.

राज्यात मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत राज्यात सरासरी 27.2 मिलीमीडर पावसाची नोंद झाली होती. तर एकूण पावसाची नोंद 2,942.5 मिलीमीटवर पोहोचली आहे. गोव्यात सर्वसामान्यपणे पावसाची सरासरी 2,905.8 मिलीमीटर इतकी आहे.

विशेष म्हणजे, अल निनोचा प्रभाव असतानाही तसेच उर्वरित भारतीय उपखंडात मान्सूनच्या पावसाची कमतरता असतानाही गोव्यात मात्र मान्सून सामान्य राहिला आहे.

मॉन्सूनमध्ये जून आणि सप्टेंबर असे दोन सक्रीय स्पेल आहेत. वातावरणीय स्थितीचा फायदा गोव्याला झाला. समुद्रसपाटीपासून सुमारे 1,500 मीटर उंचीवर असलेल्या लो-लेव्हल जेट स्ट्रीममुळे ढग गोव्यात आले. तथापि, ऑगस्ट मात्र कोरडा गेला.”

दरम्यान, या आठवड्यात मॉन्सूनने पुन्हा जोरदार सुरवात केली आहे. मंगळवारपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या कमी ते मध्यम अशा सरी सुरूच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT