Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात आत्तापर्यंत 2,780 मिलीमीटर पाऊस; दोनदा पर्जन्यविराम तरीही गाठली सरासरी

एल निनो मुळे पावसात खंड

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Monsoon 2023: गोव्यात आत्तापर्यंत 2,768 मिलीमीटर पाऊस पडला. गुरूवारी झालेल्या अधिकच्या 4 टक्के पावसाने एकूण हंगामातील सरासरी 2,780 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस राज्यात आत्तापर्यंत झाला. मान्सूनच्या स्थितीत दोन महत्त्वपूर्ण ब्रेक येऊनही पावसाने ही सरासरी गाठली आहे.

राज्यात 6 ते 17 ऑगस्टपर्यंत पावसाने दीर्घ विश्रांती घेतली होती. त्यानंतर, आताही पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्याचा पर्जन्य विराम 26 ऑगस्टपासून सुरू झाला आणि आजपर्यंत कायम आहे. शिवाय सध्याच्या हवामान निरीक्षणानुसार आणखी काही दिवस पर्जन्य विराम असाच राहू शकेल.

खरे तर गोवा हे जास्त पावसाचे ठिकाण आहे. पण कोअर मान्सून झोननेच ऑगस्टमध्ये पावसाचा दुसरा ब्रेक अनुभवला आहे. जो संपूर्ण भारतीय उपखंडासाठी अत्यंत वाईट आहे, असे मत हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात उद्भवणाऱ्या एल निनोच्या घटनेमुळे मॉन्सून कमकुवत झाल्याचे ते म्हणाले. गोवा आणि भारतीय उपखंडात पाऊस त्यामुळे पावसात खंड पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT