Goa Monsoon 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : डिचोलीत पूरसदृश स्थिती आली नियंत्रणात ; पावसाचा जोर ओसरल्याने लोकांत समाधान

35 हून अधिक झाडांची पडझड : गेले तीन-चार दिवस मुसळधार पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढताना धुमाकूळ घातला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim: गेल्या तीन-चार दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या पावसाचा जोर शनिवारी (ता.८) थोडा कमी झाल्याने डिचोलीतील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे. शनिवारी सकाळी आणि दुपारी वगळता जोरदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. गेले तीन-चार दिवस मुसळधार पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढताना धुमाकूळ घातला होता.

गेल्या चार दिवसांत घरादारांवर मिळून ३५ हून अधिक झाडांची पडझड झाली आहे. या पडझडीत खासगी आणि वीज खात्याच्या मिळून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी विविध भागात मिळून २५ हून अधिक झाडांची पडझड झाली होती. त्यामुळे डिचोली अग्निशमन दलाची धावपळ झाली. शनिवारीही दलाच्या जवानांचे मदतकार्य सुरूच होते.

तूर्तास धोका टळला

तीन ते चार दिवस पडलेल्या पावसामुळे डिचोलीसह वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. शुक्रवारी मुसळधार पावसाने नाद्यांनी धोक्याची पातळी गाठली होती. असाच पाऊस शनिवारी पडला असता, तर नद्यांचे पाणी बाहेर फुटण्याचा धोका होता. तशी शक्यता गृहीत धरून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला होता. मात्र शनिवारी पावसाचा जोर किंचित ओसरल्याने तूर्तास धोका टळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT