Goa MLA Salary Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Salary Hike: आमदारांच्या पगार वाढीला आक्षेप; विरोधकांना आठवला पर्रीकरांचा साधेपणा

आमदारांना ज्या पद्धतीने भत्ते वाढवले आहेत, त्यावरून समाजात वेगळा संदेश गेला असून त्यावरून टीकाही होत आहे- आमदार व्हेन्झी व्हिएगस

गोमन्तक डिजिटल टीम

Goa MLA Salary Hike आमदारांना वाढीव भत्ते देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधी आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्ता, वीरेश बोरकर आणि व्हेन्झी व्हिएगस यांनी जोरदार आक्षेप नोंदविले.

आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले की, पेट्रोलची मर्यादा वाढविण्याची काहीच गरज नाही. आमदारांना ज्या पद्धतीने भत्ते वाढवले आहेत, त्यावरून समाजात वेगळा संदेश गेला असून त्यावरून टीकाही होत आहे.

यावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, वैद्यकीय खर्च तीन लाखांवरून पाच लाख केला आहे. वाहनांसाठी रक्कम वाढविली असली तरी त्यावर व्याज आकारले जाणार आहे.

आतापर्यंत केवळ पाच आमदारांनी वाहनांसाठी कर्ज घेतले आहे. घरासाठी यापूर्वी 30 लाख रुपये मिळत होते, ती रक्कम वाढवून ४५ लाखांवर नेली असली तरी त्या रकमेवरही व्याज आकारले जाणार आहे.

पर्रीकरांच्या आठवणी जाग्या

अशा पद्धतीने जी वाढ केली जाते, त्यावर सरकारने सविस्तर स्पष्टीकरण द्यायला हवे होते. यापूर्वी मनोहर पर्रीकर स्पष्टीकरण देत होते, याची आठवण आमदार सरदेसाई यांनी करून दिली. शिवाय आपण अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT