Goa Sea Food Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Sea Food Festival: मीरामार बीचवरील सी फूड फेस्टिवल पुढे ढकलला; 9 तारिखपासून सुरू होणारा फेस्टिव्हल रद्द

Goa Sea Food Festival: जनहित याचिकेद्वारे समुद्रकिनाऱ्यावरून उत्सव अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Sea Food Festival: गोव्याच्या पर्यटन विभागाने मीरामार बीचवर 9-11 फेब्रुवारी दरम्यान होणारा सी फूड फेस्टिवल (Sea Food Festival) पुढे ढकलला आहे. महाधिवक्ता देवीदास पंगम यांनी या निर्णयाची माहिती न्यायालयाला दिली असल्याची माहिती समोर येतेय.

राज्यातील समुद्रकिना-यावर विशेषतः पणजी आणि परिसरातील काही रहिवाश्यांनी मिरामार समुद्रकिनाऱ्यावर महोत्सव आयोजित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला संबंधी जनहित याचिका दाखल केली होती.

या महोत्सवादरम्यान मिरामार समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या आवाजात वाजवले जाणाऱ्या संगीतामुळे इथल्या जैवविविधतेला आणि एकूणच पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे.

तसेच या फेस्टिवल दरम्यान विविध स्टॉल्समधून तयार होणारा कचरा, टाकाऊ अन्न तसेच काचेच्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लेट्स यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.

त्यामुळेच जनहित याचिकेद्वारे समुद्रकिनाऱ्यावरून उत्सव अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे.

गोव्याच्या पारंपारिक करीपासून ते सीफूड फ्यूजनपर्यंत सीफूड प्रेमी, स्थानिक आणि पर्यटकांना महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

तसेच सी फूड फेस्टिव्हल कचरा विलगीकरणासाठी प्रगत आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला जाणार असून, महोत्सवात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली होती.

आता हा सी फूड फेस्टिव्हल कुठे आणि कधी आयोजित केला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT