Goa Cabinet Reshuffle Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 5 मंत्री, 8 आमदारांची दिल्‍लीवारी! श्रेष्ठींकडून अंदाज घेण्यासाठी धडपड, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Goa Cabinet: २६ नोव्‍हेंबरपासून मंत्री, आमदारांचे दिल्‍ली दौरे सुरू झाले आहेत. तेथे जाण्‍याविषयी कारणे निरनिराळी देण्‍यात येत आहेत. काही मंत्र्यांनी गुप्‍तपणे दिल्‍ली वाऱ्या केल्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Minister and MLA Delhi Tours for Cabinet Change

पणजी: गोव्‍यात पुढील काळात राजकीय उलथापालथ अटळ असून आमदार, मंत्र्यांची मते दिल्‍लीतील श्रेष्‍ठींकडून जाणून घेतली जात आहेत.

२६ नोव्‍हेंबरपासून मंत्री, आमदारांचे दिल्‍ली दौरे सुरू झाले आहेत. तेथे जाण्‍याविषयी कारणे निरनिराळी देण्‍यात येत आहेत. काही मंत्र्यांनी गुप्‍तपणे दिल्‍ली वाऱ्या केल्‍या. मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्‍या दिल्‍लीत बऱ्याच नेत्‍यांसोबत गाठीभेटी झाल्‍या. त्‍याचवेळी सभापती रमेश तवडकरही राजधानीतच होते.

११ डिसेंबरला पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा, आमदार जीत आरोलकर यांची दिल्‍ली वारी झाली. सिक्‍वेरा दिल्‍लीत गेल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या होत्‍या. त्‍यांनी राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. त्‍याच दिवसांत मंत्री खंवटेही राजधानीत दाखल झाले होते व त्‍यांची शहांसोबत चर्चा झाल्‍याचे सूत्र सांगतात. १६ डिसेंबरला आमदार केदार नाईक, डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार संकल्‍प आमोणकरांनी दिल्‍ली पाहिली. राज्‍यसभा कामकाज पाहण्‍यासाठी हे आमदार आल्‍याचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्‍यक्ष तानावडे यांनी मखलाशी जोडली.

सभापती तवडकर तेव्‍हा तेथेच होते. १९ डिसेंबरला आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली. सोबत बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही भेट घेतली. त्‍याचवेळी आमदार दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, जीत आरोलकर हे मुख्‍यमंत्र्यांसोबत राजस्‍थानला गेले. तेथून ते दिल्‍लीला जाणार होते. तो दौरा झाला की नाही, हे गुलदस्‍त्‍यात ठेवण्‍यात आले. तथापि, सूत्रांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांची मते वरिष्‍ठांकडून जाणून घेण्‍यात आली आहेत. त्‍यानंतर आमदार आर्लेकरही दिल्‍लीला दाखल झाले.

तीन नेते केंद्रस्‍थानी

हल्‍लीच्‍या दिवसांत मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍यासह आरोग्‍यमंत्री राणे, सभापती तवडकर यांच्‍या झालेल्‍या दिल्‍लीतील फेऱ्यांकडे राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत. सध्‍या उपरोक्‍त तीन नेत्‍यांच्‍या भोवती प्रामुख्‍याने राजकारण फिरत आहे, असे सूत्र सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT