Goa Minister Sudin Dhavalikar 
गोवा

Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

Goa Minister Sudin Dhavalikar: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मंत्र्याचा हात आहे, असे कोड्यात बोलू नका, आरोप करणाऱ्यांनी नाव घ्यावे', असे प्रतिआव्हान राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले.

Manish Jadhav

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मंत्र्याचा हात आहे, असे कोड्यात बोलू नका, आरोप करणाऱ्यांनी नाव घ्यावे', असे प्रतिआव्हान राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले. तर माजी मंत्री आणि भाजप नेते दिलीप परुळेकरही पोटतिडकीने व्यक्त झाले आहेत. रामा काणकोणकर प्रकरणात एक मंत्री गुंतला असल्याचा दावा आमदार फेरेरा आणि व्हिएगस यांनी केला. त्यावर पत्रकारांनी ढवळीकर यांना छेडले असता, त्यांनी हे वक्तव्य केले.

मंत्रिमंडळात एकूण 12 जण आहेत, त्यामुळे हे मोघम आरोप मंत्र्यांच्या छबीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ढवळीकर यांनी बेछूट आरोप करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तर दुसरीकडे, हल्ला प्रकरणातील संशयित आणि कुख्यात गुंड जेनिटी कादोंजसह सात जणांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान पोलिसांनी सात दिवसांचा रिमांड मागितला होता. मात्र न्यायालयाने संशयितांची दोन दिवसांची कोठडी दिली.

सात दिवसांची होती मागणी

दरम्यान, या प्रकरणातील आठ संशयितांना मेरशी येथील जेएमएफसी कोर्टमध्ये हजर करण्यात आले. पोलिसांकडून सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली. तथापि दोन दिवसांचीच कोठडी मंजूर झाली. शुक्रवारी पुन्हा संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले.

दिलीप परुळेकर काय म्हणाले?

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी माजी पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते दिलीप परुळेकरही तीव्रतेने व्यक्त झाले. एका पोर्टलशी बोलताना ते म्हणाले, 'रामावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. त्यामागे कोण आहे, हे साऱ्या जनतेला, सरकारला ठावूक आहे. अशा प्रवृत्तींना पाठिशी घालू नका. पर्रीकरांच्या काळात असे घडत नव्हते. कायद्याचा धाक होता. हल्ल्यामागे जो कोणी आहे, त्याला गाडीला बांधा आणि ओढत पोलिस ठाण्यात आणा, असे घडले तरच कायद्याचा धाक राहील.''

'रामाचा जबाब नोंदवलेला नाही'

पीडित रामा काणकोणकर अजूनही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. दररोज आम्ही त्यांची चौकशी करण्यासाठी जात आहोत आणि त्यांचा जबाब घेण्याचा प्रयन करतो, पण ते जबानी देण्याच्या स्थितीत नाहीत, तसेच साक्षीदाराचेही जबाब अद्याप घेतलेले नाहीत, असे पोलिसांनी न्यायालयात (Court) सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT