Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

Vacant Minister Post: रवी नाईक यांचे अवघ्‍या दोनच दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. त्‍यामुळे या पदी कुणाची नेमणूक करावी, याचा निर्णय मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाने तूर्तास घेतलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कृषिमंत्री रवी नाईक यांच्‍या निधनामुळे रिक्त झालेले राज्‍य मंत्रिमंडळातील एक मंत्रिपद कुणाला मिळणार? याबाबत चर्चा सुरू झालेल्‍या असतानाच मंत्रिपदासाठी इच्‍छुक असलेल्‍या आमदार संकल्‍प आमोणकर आणि मायकल लोबो यांच्‍या आशा पुन्‍हा एकदा पल्लवित झाल्‍या आहेत.

रवी नाईक यांचे अवघ्‍या दोनच दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. त्‍यामुळे या पदी कुणाची नेमणूक करावी, याचा निर्णय मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाने तूर्तास घेतलेला नाही, अशी माहिती भाजपातील सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

लोकनेते तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्‍या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. बुधवारी त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कारही करण्‍यात आले. त्‍यानंतर आता मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री डॉ. सावंत कुणाची वर्णी लावणार? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून आहे. नुकतीच मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करताना आलेक्‍स सिक्‍वेरांच्‍या जागी दिगंबर कामत आणि गोविंद गावडे यांच्‍या जागी रमेश तवडकर यांची वर्णी लावली होती.

त्‍यावेळी मंत्रिपदाच्‍या शर्यतीत कामत, तवडकर यांच्‍यासह आमदार संकल्‍प आमोणकर आणि मायकल लोबोही होते. परंतु, मुख्‍यमंत्र्यांनी या दोघांना बाजूलाच ठेवत कामत आणि तवडकर यांच्‍या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली. त्‍यामुळे आमोणकर आणि लोबो यांचे मंत्रिपद हुकले होते.

दरम्‍यान, आता रवींच्‍या जागा एकाची नेमणूक करायची असल्‍याने त्‍यावेळी हुकलेले मंत्रिपद मिळेल, अशी आशा या दोन्‍ही आमदारांना आहे. परंतु, रवी नाईक यांचे ज्‍येष्‍ठ पुत्र रितेश नाईक यांना फोंड्यातून बिनविरोध निवडून आणण्‍यासाठी सर्व पक्षांनी पुढे यावे, असे आवाहन मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकरयांनी केल्‍याने आणि अखिल गोवा भंडारी समाजाने मंत्रिमंडळात

रवींच्‍या जागी रितेश नाईक यांची वर्णी लावावी, अशी मागणी केल्‍यामुळे मुख्‍यमंत्री आणि भाजप काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून आहे.

...म्‍हणून रितेशना बिनविरोध निवडावे

राज्‍य विधानसभा निवडणूक अवघ्‍या १७ महिन्‍यांवर आलेली आहे. त्‍यात फोंड्यातील पोटनिवडणूक सहा महिन्‍यांनी घेतल्‍यास तेथून निवडून येणाऱ्या आमदाराला कामासाठी वेळ मिळणार नाही. त्‍यामुळे या जागी रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून आणण्‍यासाठी सर्वच पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन आपण केलेले आहे. याबाबत भाजपशी आपली चर्चाही झालेली आहे. रितेश यांना तत्‍काळ मंत्रिमंडळात स्‍थान द्यायचे की नाही, याचा निर्णय मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घेतील, असे मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर म्‍हणाले.

योग्‍य वेळी योग्‍य निर्णय

रवी नाईक यांचे निधन होऊन अवघे दोन दिवस झालेले आहेत. त्‍यामुळे तूर्तास पक्षाने याबाबत काहीही विचार केलेला नाही. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही गोव्‍याबाहेर आहेत. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक तसेच मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत योग्‍यवेळी योग्‍य तो निर्णय घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail Drug Racket: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT