Minister Vishwajit Rane at Udaan Program in Taleigao, Panaji - Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: उद्योजकता क्षेत्रातील संधीचा महिलांनी लाभ घ्यावा; मंत्री विश्वजित राणे

ताळगाव येथे महिलांसाठी आयोजित 'उडाण' या कार्यक्रमात मंत्री राणे यांचे मार्गदर्शन

Dainik Gomantak

पणजी: गोवा सरकारने (Goa Govt.) महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. उद्योजकता क्षेत्रात अनेक संधी निर्माण केल्या आहेत. या संधीचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात महिलांनी उद्योजक व्हावे व इतर महिलांसमोर आदर्श उभे करावेत. असे आवाहन कौशल्य व उद्योजकता खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे (Minister Vishwajit Rane) यांनी आज केले. ताळगाव येथील सभागृहात आज महिलांसाठी आयोजित 'उडाण' (Udaan) या कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी कौशल्य व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव चोखाराम गर्ग, संचालक दिपक देसाई, सहाय्यक संचालक राजेश लोललेयकर व विनायक कांबळी व्यसपिठावर उपस्थित होते.

सध्याच्या कळात महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. महिलांच्या कामाची व्याप्ती वाढलेली आहे. गोव्यातील महिलांच्या विकासासाठी कौशल्य उद्योजकता मंत्रालयाने विविध उपक्रम राबवले. त्याचा परिणाम दिसून येत असून महिला मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण करून स्वतः उद्योजक होत आहेत. ही सकारात्मक बाब असल्याचे सांगून महिलांच्या विकासासाठी आपले महिला व बाल कल्याण तसेच कौशल्य उद्योग खाती सदैव कटीबध्द राहणार असल्याचे राणे म्हणाले. राज्यातील आयटीआयमध्ये नव नव्या कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला असून त्याचा लाभ युवक व युवतींनी घ्यावा. असे आवाहन करुन कोविड काळात महिला कोविड योध्यांचे काम वाखाणण्याजोगे होते. असे राणे म्हणाले.

या कार्यक्रमात मंत्री राणे यांच्या हस्ते उद्योजक झालेल्या समिता साखळकर, सारीका परब आदी महिलांचा गौरव करण्यात आला .तसेच काही महिला कोविड योध्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. दिवसभराच्या या 'उडाण' कार्यक्रमात महिलांत उद्योजकतेसाठी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी चर्चासत्र, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन, योजनांची माहिती व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले. पूनम सिरसाट, तुशार सावंत, दलीप परब यांनी यांनी महिल उद्योजकतेवर मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT