Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: सरकारी गोदामातून गहू, तांदळाची तस्करी नाही; नागरी पुरवठा मंत्र्यांची माहिती

विरोधी पक्षातील आमदारांनी उपस्थित केला होता प्रश्न

Akshay Nirmale

Goa Assembly Session: राज्य सरकारच्या गोदामांतून गहू आणि तांदूळ तस्करीच्या आरोपाखाली पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर २ महिने उलटून गेले आहेत. दरम्यान, त्यानंतरच्या काळात गोदामांतून गहू, तांदुळ तस्करीचे एखही प्रकरण समोर आलेले नाही अशी माहिती, राज्याचे नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी विधानसभा सभागृहात दिली.

विधानसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड पार्टी), कार्लुस फरेरा (काँग्रेस) आणि क्रुझ सिल्वा (आप) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. शिधापत्रिकाधारकांसाठी असलेल्या गहू व तांदळाच्या तस्करीची विभागाने काही चौकशी केली आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना नाईक म्हणाले की, विभागाकडे या प्रकरणाची कोणतीही तक्रार आलेली नाही. रेशनकार्डधारकांसाठी गहू व तांदूळ तस्करीची तक्रारच आलेली नसल्याने याबाबत काही प्रश्नच उद्भवत नाही. विभागातील सर्व गोदामांची तातडीने दुरुस्ती आणि नूतनीकरणाची गरज आहे. या गोदामांमध्ये योग्य कार्यालयीन जागा तयार करणे आवश्यक आहे. धरबांदोरा तालुक्यात अतिरिक्त एका गोदामासह सर्व गोदामाच्या छतांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुन्हे शाखेने नोव्हेंबर 2022 मध्ये नागरी पुरवठा विभागाच्या गोदामातून तांदूळ आणि गव्हाच्या पिशव्यांची तस्करी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price Goa: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

VIDEO: 'जगाचे नेते भाषण ऐकताहेत, हे साहेब ट्रेंडिंग रिल्स शोधताहेत'! युएन बैठकीतील सीरियाई राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट टाइमपास व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

SCROLL FOR NEXT