चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो सोबत इतर  दैनिक गोमन्तक
गोवा

हॉस्पिटलच्या मल्टी टास्किंग स्टाफला कायम करण्याची गरज: मंत्री माविन गुदीनो

चिखली उपजिल्हा रुग्णालयातील मल्टी टास्किंग स्टाफला स्वतःच्या खिशातून वेतन दे असल्याचा दावा.

Dainik Gomantak

Goa: चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये (Chikalim Sub District Hospital) प्रधानमंत्री निधीतून (PM Fund) उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो (Transport Minister Mauvin Godinho) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी काही समस्यांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की, या इस्पितळातील काही मल्टी टास्किंग स्टाफला मी माझ्या खिशातून आतापर्यंत वेतन देत आहे. त्या स्टाफला नोकरीत कायम करण्याची गरज आहे. ते काम सोडून गेल्यास पुन्हा समस्या निर्माण होतील. या इस्पितळासाठी ऑपरेशन थिएटरची गरज आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे मी समाजातील काहीजणांकडून आणू शकतो. परंतु, ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे डॉक्टर, सर्जन, भूलतज्ज्ञ डॉक्टर आदींची भरती लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी माझा प्रयत्नअसल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

वाहतूक विभागांमध्ये येणाऱ्यांची कामे करण्यासाठी पूर्वी एजंट होते. मात्र, यापुढे ते दिसणार नाही. त्याऐवजी गाव पातळीवरील उद्योजक तयार केले आहेत. त्यांना मान्यता देण्यात आली असून ते संबंधितांचे फॉर्म भरून देण्यासाठी प्रति व्यक्ती शंभर रुपयेघेतील. अशा पध्दतीने संपूर्ण गोव्यात 1500 जणांची सेवा मिळणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात कोठेही अपघात झाल्यावर त्यांची माहिती सर्व सरकारी संबंधित विभागांना लगेच उपलब्ध होईल. सदर अपघात कसा. कोठे.कोणत्या वाहनांमध्ये झाला, वाहन किती जुने होते यासंबंधी सर्व छायाचित्रे लगेच उपलब्ध होतील. अपघात झाला त्या रस्त्याच्या स्थितीसंबंधीही माहिती मिळेल. वळणामुळे किंवा इतर कारणास्तव अपघात होत असेल तर सर्व माहिती संबंधित खात्यांकडे जाईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT