mining activities Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: प्रश्न खाणींचा!! दोन्ही ग्रामसभा तापल्या मुळगावात विरोध; अडवलपालमध्ये समर्थन

Mining Issue Goa: डिचोली तालुक्यातील मुळगाव आणि अडवलपाल पंचायतींच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खनिज विषय तापला

Akshata Chhatre

डिचोली: डिचोली तालुक्यातील मुळगाव आणि अडवलपाल पंचायतींच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खनिज विषय तापला. मुळगावच्या ग्रामसभेत लोकांचा खाणीला विरोध कायम असल्याचे दिसून आले तर अडवलपालच्या ग्रामसभेत खाण समर्थकांनी खाणीला समर्थन देत खाणीला दिलेली 'एनओसी' पंचायतीने मागे घेऊ नये, अशी मागणी केली.

मुळगावात ठराव

मुळगावात खाण व्यवसाय सुरू झाला असला, तरी त्याचा गावाला काहीच फायदा नाही उलट गावचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारसह खाण कंपनी गावचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप मुळगाव ग्रामसभेत लोकांनी केला.

खाणप्रश्री ग्रामस्थांची सर्वसाधारण सभा घेवून खाण बंद करावी, असा ठराव माजी सरपंच तथा देवस्थानचे अध्यक्ष वसंत गाड यांनी ग्रामसमेत घेतला. आजच्या ग्रामसभेला जवळपास शंभर लोक उपस्थित होते.

'आम्हाला हवाय खाण व्यवसाय'

अडवलपाल पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसमेत ट्रकमालकांसह खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांनी खाणीला समर्थन दिले. "आम्हाला खाण व्यवसाय हवा आहे". खाण कंपनीला पंचायतीने दिलेली एनओसी मागे घेऊ नये, अशी मागणी ट्रकमालकांसह खाण समर्थक लोकांनी आजच्या ग्रामसमेत केली तसेच तसा ठरावही संमत केला. गाव सांभाळून खाण व्यवसाय करावा, अशी मागणी यावेळी खाण समर्थकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT