Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : गुपचूप हालचाली करण्यामागचे गौडबंगाल काय?

गोव्यात चार खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्याचे सूतोवाच सरकारने केले असले तरी ही प्रक्रिया पूर्णतः अपारदर्शक असल्याचा आरोप पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात चार खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्याचे सूतोवाच सरकारने केले असले तरी ही प्रक्रिया पूर्णतः अपारदर्शक असल्याचा आरोप पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई यांनी केला आहे.

सरकारला जर खाणींचा लिलाव करायचा असेल तर त्यांनी तो कसा केला जाईल, त्यात कोण सहभागी असतील, त्याचे स्थानिकांना फायदे काय मिळतील, याचा तपशील जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारने तसे न करता गुपचूप प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सरकारला त्यातून भ्रष्टाचार करायचा आहे की काय अशी शंका येते, असे ते म्हणाले.

वास्तविक आमच्या अभ्यासाप्रमाणे गोव्यात खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा एवढा विध्वंस झाला आहे, की येथे पुढची 10 वर्षे तरी खाणी सुरू होणे शक्य नाही. सरकारने खाणींचा लिलाव केला तरी त्यासाठी पर्यावरण परवाने मिळणार का, याबद्दल शंकाच आहे. सरकार याबाबत गंभीर असेल तर त्यांनी खाणींचा स्थानिकांना कसा फायदा होईल, हे पाहणे आवश्यक आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

लोकांना फसविण्यासाठी घोषणा : पुती गावकर

सरकारने खाणी सुरू करणार, अशा घोषणा अनेकदा केल्या आहेत. तरीही खाणी सुरू झाल्या नाहीत, हा पूर्वेतिहास पाहता सरकारची खाणींचा लिलाव करण्याची घोषणा पोकळ ठरणार नाही ना, अशी शंका मायनिंग पीपल्स फ्रंटचे पुती गावकर यांनी व्यक्त केली.

सरकारवर माझा अजिबात विश्वास नाही. ज्यावेळी खाणी सुरू होतील, त्यावेळी विश्वास ठेवणे शक्य आहे. सहा महिने होऊनही दिलेल्या शब्दाप्रमाणे खाणी सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांना पुन्हा फसविण्यासाठीच सरकारने ही घोषणा केली असावी, असा आरोप गावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT