Goa Taxi APP | Minister Mauvin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi : एक रुपयाही न खर्चता टॅक्सी सेवा सुरु करा, गोवा माईल्स देणार भांडवल

लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार योजनेचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi : राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवा उद्योजक अथवा वाहतूक उद्योजक योजना लवकरच सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उद्‍घाटन केले जाईल. या टॅक्सी ॲप सेवेसाठी गोवा माईल्स युवकांना स्वतःचे भांडवल वापरून टॅक्सी उपलब्ध करून देणार आहे. ही योजना ॲप आधारित आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

या योजनेद्वारे गोवा माईल्सकडून युवकांना अगदी एक रुपयाची गुंतवणूक न करता टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. या योजनेत टॅक्सी चालवण्याचा बॅजचीही सक्ती नाही तसेच त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा, असेही नाही.

टॅक्सी घेण्यासाठी सुरुवातीची रक्कम गोवा माईल्सच जमा करणार आहे. व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला की गोवा माईल्स ही सुरुवातीची रक्कम तसेच गाडीचा हप्ता हळूहळू त्यातून वजा करून घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT